मुंबई : नवरात्रीचा पवित्र सण आता फक्त एक दिवसावर येऊन ठेपला आहे. यादरम्यान देवी दुर्गाची संपूर्ण नऊ दिवस विधिवत पूजा केली जाते आणि देवीला कल्याणची कामना केली जाते. या दरम्यान, मंदिरांमध्ये खूप गर्दी असते.
देवी दुर्गाला समर्पित असलेली ही शारदीय नवरात्री वर्षभरात साजरी होणाऱ्या चार नवरात्रींपैकी सर्वात महत्वाची आहे. या उत्सवात देवी दुर्गाच्या 9 स्वरुपांची पूजा केली जाते.
हा उत्सव भारतीय सांस्कृतिक क्षेत्राच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी साजरा केला जातो. हा उत्सव अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्ष प्रतिपदेपासून सुरु होतो.
या वर्षी ते 7 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि 15 ऑक्टोबर पर्यंत चालेल. हा सण हिंदूंसाठी एक पवित्र सण असल्याने, उपास करण्यापूर्वी आणि देवी दुर्गाला प्रार्थना करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
म्हणूनच, येथे आम्ही नवरात्रीच्या दरम्यान काय करावे आणि काय करु नये हे तुम्हाला सांगणार आहोत –
नवरात्री 2021 : काय करावे?
? हा एक अतिशय पवित्र सण आहे, म्हणून यामध्ये स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे विशेषतः या काळात. दररोज आंघोळ करा, स्वच्छ कपडे घाला आणि प्रार्थनास्थळ देखील स्वच्छ करा.
? पहिल्या दिवशी (प्रतिपदा तिथी), कलश प्रतिष्ठापना मुहूर्ताच्या वेळेस आणि विधीनुसारच करावी.
? दिवसातून दोनदा कलशासमोर तुपाचा दिवा लावा. आरती आणि नैवेद्यही दोन्ही वेळा करा.
? दुर्गा सप्तशतीचे पठण करा, देवी दुर्गाचे मंत्र आणि स्तोत्राचा जप करा.
? जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर उपवास करा आणि धार्मिक विधी पाळा. फक्त सात्विक अन्न खा आणि आत्मसंयम ठेवा.
? नवरात्रीच्या दरम्यान सर्वत्र पवित्र वातावरण असते, म्हणून आध्यात्मिक प्रबोधन आणि तपस्येसह आत्मसाक्षात्कारसाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो.
नवरात्री 2021 : काय करु नये?
? जर कलशाच्या आधी अखंड ज्योती प्रज्वलित केली असेल तर ती विझवू नका, ती सतत प्रकाशमय राहील याची खात्री करा.
? आपण उपासादरम्यान उपाशी राहू नका, उपवासाचे अन्न घ्या.
? मांसाहार करु नका आणि मद्याचं सेवनही करु नका.
? नवरात्री दरम्यान दाढी करु नये किंवा केसही कापू नये.
? नखे कापू नये.
? कोणाबद्दल कठोर होऊ नका, राग टाळा आणि ध्यानाने स्वतःला आनंदी ठेवा.
Shardiya Navratri 2021 : दुर्दैवाला सुदैवात बदलायचं असले तर नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवीच्या या 5 मंत्रांचा जप नक्की कराhttps://t.co/GxetwkHZJ5#ShardiyaNavratri2021 #MataDurga #DurgaSaptshati
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 5, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Navratri 2021: घटस्थापना म्हणजे काय? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि सर्व काही
Shardiya Navratri 2021 : दुर्गा माता केवळ सिंहावरच आरुढ का होते, जाणून घ्या पौराणिक कथा