Shiv Puja : शिवलींगावर जलाभिषेक करण्याची ही आहे योग्य पद्धत, होतात सर्व इच्छा पुर्ण

| Updated on: Apr 24, 2023 | 9:49 AM

असे मानले जाते की जलाभिषेक केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात. यासाठी शिवलिंगाला जल अर्पण करताना काही नियमांचे पालन करावे लागेल.

Shiv Puja : शिवलींगावर जलाभिषेक करण्याची ही आहे योग्य पद्धत, होतात सर्व इच्छा पुर्ण
शिवलींग
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : भगवान शिवाला प्रसन्न करणे सर्वात सोपे असल्याचे धार्मिक शास्त्रांमध्ये सांगितले आहे. महादेव आपल्या भक्तांवर सहज प्रसन्न होतात, म्हणून त्यांना भोलेनाथ म्हणतात. सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे. सोमवारी विधि-नियमानुसार भगवान शंकराची पूजा (Shiv Puja) केल्याने भक्तांच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात. असे मानले जाते की जलाभिषेक केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात. यासाठी शिवलिंगाला जल अर्पण करताना काही नियमांचे पालन करावे लागेल, अन्यथा शिवलिंगाला चुकीच्या पद्धतीने जल अर्पण केल्यास त्याचे योग्य फळ मिळणार नाही.

शिवलिंगावर जल अर्पण करण्याचे नियम

  1.  शिवलिंगावर जल अर्पण करताना हे लक्षात ठेवा की तुमचे तोंड पूर्व दिशेला नसावे कारण पूर्व दिशा हे भगवान शंकराचे मुख्य द्वार मानले जाते. अशा वेळी पूर्वेकडे तोंड करून जल अर्पण केल्याने शिवाच्या दारात अडथळा निर्माण होतो. असे केल्यास फलप्राप्ती होत नाही.
  2. तसेच शिवलिंगाला जल अर्पण करताना व्यक्तीचे तोंड उत्तर आणि पश्चिम दिशेला नसावे कारण भगवान शंकराचा खांदा आणि पाठ याच दिशांना आहे. त्यामुळे या दिशेला तोंड करून पाणी अर्पण केल्याने त्याचा पूर्ण परिणाम होत नाही.
  3.  शिवलिंगावर जलाभिषेक करतांना दक्षिण दिशेला तोंड करणे उत्तम मानले जाते. असे केल्याने जलाभिषेकाचे पूर्ण फळ मिळते. भगवान शिव प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.
  4.  शिवलिंगावर नेहमी तांब्या किंवा पितळाच्या भांड्यात जल अर्पण करा. चांदीच्या भांड्यातून जल अर्पण करणे देखील शुभ असते. पण कधीही स्टीलच्या भांड्यातून किंवा गडव्यातून जलाभिषेक करू नका. शनि-राहूचा स्टील किंवा लोखंडावर प्रभाव असतो, ज्यामुळे अशुभ परिणाम मिळतात.
  5.  शिवलिंगाला जल अर्पण करताना तांब्याने पाणी उभडू नये, तर लहान धार करून जल अर्पण करावे. या दरम्यान ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत राहा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)