अद्भुत चमत्कार! झाडातून वाहू लागली आहे गंगा?; गावकऱ्यांनी सुरु केली झाडाची पूजा

| Updated on: Jun 27, 2022 | 4:25 PM

मध्य प्रदेशातील शिवपुरी-जिल्ह्यातील पोहरी नगर (Shivpuri Pohari nagar)  येथे सोमवारी सकाळी झाडावरून पाण्याचा प्रवाह (Floating water from tree) वाहताना पाहून लोक आश्चर्यचकित झाले. निसर्गाचा हा चमत्कार पाहण्यासाठी लोकांनी एकाच गर्दी केली. काही ग्रामस्थांच्या मते ही जलधारा गंगा नदीची आहे.  हा दैवी चमत्कार असल्याचे मानत झाडातून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाची लोकं पूजा करू लागली आहेत. मिळालेल्या […]

अद्भुत चमत्कार! झाडातून वाहू लागली आहे गंगा?; गावकऱ्यांनी सुरु केली झाडाची पूजा
Follow us on

मध्य प्रदेशातील शिवपुरी-जिल्ह्यातील पोहरी नगर (Shivpuri Pohari nagar)  येथे सोमवारी सकाळी झाडावरून पाण्याचा प्रवाह (Floating water from tree) वाहताना पाहून लोक आश्चर्यचकित झाले. निसर्गाचा हा चमत्कार पाहण्यासाठी लोकांनी एकाच गर्दी केली. काही ग्रामस्थांच्या मते ही जलधारा गंगा नदीची आहे.  हा दैवी चमत्कार असल्याचे मानत झाडातून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाची लोकं पूजा करू लागली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पोहरी नगरच्या मुख्य बाजारपेठेच्या ब्लॉक रोडवर मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या काही लोकांना शिसवच्या झाडामधून  पाणी वाहत असल्याचे दिसले. लोकांनी बारकाईने पाहिले असता त्यांना त्यातून गंगेसारखे स्वच्छ पाणी दिसले. हे पाहून लोक आश्चर्यचकित झाले आणि पाहता पाहता तेथे लोकांची गर्दी जमा झाली.

 

लोकांच्या गर्दीत श्रद्धा जागृत झाली. काहींनी याला चमत्कार, तर काहींनी गंगा आल्याचे सांगितले, पोहरी नगरात झाडावरून पाणी वाहत असल्याची बातमी आगीसारखी पसरली आहे. वाहत्या पाण्याच्या प्रवाहाची पूजा करताना लोकांनी गंगा मातेचा जप करण्यास सुरवात केली. गोपी जाटव या ग्रामस्थाच्या मते झाडातून सकाळपासून सतत पाणी वाहत आहे. या ग्रामस्थाने हा गंगा मातेचा चमत्कार असल्याचे सांगितले.

तर दुसरीकडे ज्या शिसवच्या झाडातून पाण्याचा प्रवाह वाहत आहे ते शेकडो वर्षे जुने असल्याने त्याची मूळ पोकळ झाल्याने हा प्रवाह येत असल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे.  तर काही जणांच्या मते  झाडाच्या आजूबाजूला जमिनीत पाण्याची पाइपलाइन फुटल्याने हे पाणी येत आहे. पाईपमधून बाहेर पडणारे पाणी झाडाच्या मुळांच्या मदतीनेही बाहेर येऊ शकते असाही निकष आहे. पोहरीचे एसडीएम बी नादिया यांच्या मते तपासानंतर खरं काय ते स्पष्ट होईल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)