Shravan Somvar 2021 | आज दुसरा श्रावणी सोमवार, जाणून घ्या आज महादेवांना कुठली शिवामूठ वाहावी

| Updated on: Aug 16, 2021 | 11:01 AM

श्रावण महिना 09 ऑगस्ट 2021 पासून सुरु झाला आणि 6 सप्टेंबर 2021 रोजी संपेल. तर श्रावणातील दुसरा श्रावणी सोमवार आज म्हणजेच 16 ऑगस्टला आहे. यंदा श्रावण महिन्यात पाच सोमवार असणार आहेत. आज दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवाला तीळ मूठ अर्पण करावी.

Shravan Somvar 2021 | आज दुसरा श्रावणी सोमवार, जाणून घ्या आज महादेवांना कुठली शिवामूठ वाहावी
दुसरा श्रावणी सोमवार
Follow us on

मुंबई : पवित्र श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरुन या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिना म्हटलं की निर्मळ वातावरण, पवित्र महिना आणि शिवभक्तांसाठी तर त्यांच्या आराध्य महादेवांना प्रसन्न करण्याचा महिना आहे.

यावर्षी श्रावण महिना 09 ऑगस्ट 2021 पासून सुरु झाला आणि 6 सप्टेंबर 2021 रोजी संपेल. तर श्रावणातील दुसरा श्रावणी सोमवार आज म्हणजेच 16 ऑगस्टला आहे. यंदा श्रावण महिन्यात पाच सोमवार असणार आहेत. आज दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवाला तीळ मूठ अर्पण करावी. शंकराची पूजा कशी करावी आणि आजचा शुभ योग काय हे जाणून घेऊ –

श्रावणी सोमवारी शंकराची पूजा कशी करावी –

? श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे, त्यानंतर व्रताचा संकल्प करावा

? त्यानंतर देवघर पूर्णपणे स्वच्छ करुन पूजा करावी.

? एका थाळीत शंकराची पिंड ठेवावी, त्यानंतर शिवलिंगावर जल आणि गायीच्या दुधाने अभिषेक करावा

? त्यानंतर महादेवांना अत्यंत प्रिय असलेली पांढरी फुलं, अक्षता, कुंकू, बेलाची पानं, धतुरा अर्पण करावे, दिवा लावला

? पूजा करत असताना “ॐ महाशिवाय सोमाय नम:” किंवा “ॐ नम: शिवाय” या मंत्राचा जप करावा

? त्यानंतर शिवलिंगावर त्या त्या दिवसाप्रमाणे मूठ अर्पण करावी.

? धान्यमूठ शिवलिंगावर उभी धरुन वाहावी, ही शिवामूठ वाहताना पुढील मंत्र म्हणावा-

नमः शिवाय शांताय पंचवक्‍त्राय शूलिने ।
शृंगिभृंगिमहाकालगणयुक्ताय शंभवे।।

? तसेच, शिवामूठ वाहताना “शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू-सासरा, दिरा-भावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडतीची आवडती कर देवा”, असे म्हणत महादेवाची मनोभावे पूजा करावी.

? त्यानंतर शंकराची आरती म्हणावी आणि शंकराकडे सुख-समृद्धीची प्रार्थना करावी

? दिवसभर उपवास करावा आणि संध्याकाळी देवाला बेलपत्र वाहून उपवास सोडावा

कुठल्या दिवशी शिवाला कुठली मूठ वाहावी?

❇️ पहिला श्रावणी सोमवार – 9 ऑगस्ट 2021 – तांदूळ शिवमूठ

❇️ दुसरा श्रावणी सोमवार – 16 ऑगस्ट 2021 – तीळ शिवमूठ

❇️ तिसरा श्रावणी सोमवार – 23 ऑगस्ट 2021 – मूग शिवमूठ

❇️ चौथा श्रावणी सोमवार – 30 ऑगस्ट 2021 – जव शिवमूठ

❇️ पाचवा श्रावणी सोमवार – 6 सप्टेंबर 2021 – सातू शिवमूठ

दुसऱ्या श्रावणी सोमवारचे योग

2021 मधील दुसऱ्या श्रावणी सोमवारी अनेक अद्भूत योग आणि इतर सण आहेत. आज ऐंद्र योग आहे. तसेच या दिवशी बालव करण आणि नक्षत्र अनुराधा राहणार आहे. तसेच या दिवशी सूर्याचा मघा नक्षत्रप्रवेश होणार असून, पतेती म्हणजे पारसी नववर्षारंभ असणार आहे.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Shravan 2021 : श्रावण महिन्यात भगवान शंकराची फोटो लावताना ‘हे’ नियम पाळा

5 श्रावणी सोमवार, महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंग : ज्योतिर्लिंग परळी वैद्यनाथ, जाणून घ्या या जागृत देवस्थानाची माहिती