मुंबई : आज देशभरात गोकुळाष्टमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. श्रावण महिन्यात श्री कृष्णाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. कृष्ण गोकुळाष्टमीच्या दिवशी लोक उपवास करतात आणि दिवसभर पूजा करतात. यावर्षी श्री कृष्णाची 5247 वी जयंती साजरी केली जात आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला गोकुळाष्टमी उत्सव साजरा केला जातो.
या विशेष दिवशी घरे आणि मंदिरे विशेष सजवली जातात. जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णभक्त देवाच्या भक्तीत मग्न असतात. रात्री 12 वाजेपर्यंत मंदिरांमध्ये श्रीकृष्णाची गाणी गायली जातात. या दिवसाचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व जाणून घेऊया.
धर्मग्रंथांनुसार यावेळी गोकुळाष्टमीच्या दिवशी तोच संयोग घडत आहे जो द्वापार युगात श्री कृष्णाच्या जन्माच्या दिवशी होता. यावेळी गोकुळाष्टमीच्या दिवशी अनेक शुभ योगायोग होत आहेत. कृष्ण गोकुळाष्टमीला जयंती आणि रोहिणी नक्षत्र योग येत आहेत. याशिवाय, अष्टमी तिथीला चंद्र वृषभ राशीत उपस्थित राहणार आहेॉ.
आज कृष्ण गोकुळाष्टमीचा सण साजरा होत आहे. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी 29 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 11.25 वाजता सुरु झाली जी 30 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 02 वाजेपर्यंत राहील. गोकुळाष्टमीच्या पूजेसाठी शुभ वेळ सकाळी 11.59 ते दुपारी 12.44 पर्यंत असेल.
? गोकुळाष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे आणि आंघोळ करुन स्वच्छ वस्त्र परिधान करावे. त्यानंतर उपवास आणि पूजा करण्याचा संकल्प घ्या.
? या दिवशी कृष्णभक्त उपवास ठेवतात आणि रात्री 12 वाजता कृष्ण जन्म साजरा करतात.
? गोकुळाष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाची बालस्वरुपाची पूजा केली जाते.
? रात्री पंचामृताने श्रीकृष्णाच्या मुर्तीवर अभिषेक करा आणि नंतर त्यांना नवीन कपडे, मोराचा मुकुट, बासरी, चंदन, वैजयंती माळ, तुळस, फळे, फुले, सुका मेवा, धूप, दिवा, अत्तर इत्यादी श्रीकृष्णाला अर्पण करा.
? मग लड्डू गोपाळचा पाळणा हलवा. यानंतर, लोणी, मिश्री किंवा धण्याच्या पंजिरीचं नैवेद्य त्यांना अर्पण करा आणि आरती केल्यानंतर प्रसाद वाटप करा.
जन्माष्टमीच्या दिवशी उपवास केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. विशेषतः बाळ नसलेल्या दांपत्याने गोकुळाष्टमीचा व्रत केल्याने संतान प्राप्ती होते. मान्यता आहे की, हे व्रत केल्याने तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल. जन्माष्टमीच्या दिवशी बरेच लोक विशेष उपाय करतात जेणेकरुन त्या सर्व समस्या दूर होतील. ज्योतिषांच्या मते, हे उपाय केल्याने आर्थिक समस्यांसह कौटुंबिक समस्याही दूर होतात. शास्त्रांमध्ये कृष्ण जन्माष्टमीच्या व्रताला व्रतराज असेही म्हणतात. असे मानले जाते की हे व्रत केल्याने तुमचे सर्व त्रास दूर होतात, तुम्हाला अनेक पटीने परिणाम मिळतात.
ओम देवकी सूत गोविंद वासुदेव जगत्पते।
देहि मे तनयं कृष्ण त्वामहं शरणं गत:।।
ज्यांना मुले नाहीत त्यांनी व्रत ठेवून 108 वेळा या मंत्राचा जप करावा.
Janmashtami 2021 | गोकुळाष्टमीच्या दिवशी मोर पीसचे ‘हे’ उपाय दूर करतील सर्व समस्याhttps://t.co/1s3U5LYQhQ#Janmashtami2021 #ShriKrishna #LordKrishna
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 28, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Janmashtami 2021 | श्रीकृष्णाला मोरपीस आणि बासरी इतकी प्रिय का? जाणून घ्या यामागील कारण…