shakambharib Pornima 2022 | दुर्गेचं महात्म्य सांगणाऱ्या शाकंभरी पैर्णिमेचे महत्त्व, पुजा विधी आणि मुहूर्त

| Updated on: Jan 17, 2022 | 6:00 AM

पौष महिन्यात (Paush Month) येणाऱ्या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा म्हटलं जातं. संपूर्ण जगाची अधिष्ठात्री असणार्‍या दुर्गेचं एक रूप म्हणजे शाकंभरी देवी होय.

shakambharib Pornima 2022 | दुर्गेचं महात्म्य सांगणाऱ्या शाकंभरी पैर्णिमेचे महत्त्व, पुजा विधी आणि मुहूर्त
Goddess-Durga
Follow us on

मुंबई : पौष महिन्यात (Paush Month) येणाऱ्या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा म्हटलं जातं. संपूर्ण जगाची अधिष्ठात्री असणार्‍या दुर्गेचं एक रूप म्हणजे शाकंभरी देवी होय. देवीच्या दुर्गेच्या (Durga)रुपाला तिला हजारो डोळे होते म्हणून शाकंभरी असे नाव पडलं. या पौर्णिमेनिमित्तानं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यात्रा आणि उत्सवांचं आयोजन करण्यात येतं. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यस्वयंभू शक्तीपीठ असलेल्या श्री सप्तशृंग देवी गडावर शाकंभरी उत्सवाचे आयोजन करण्यात येतं.

शाकंभरी पैर्णिमेचे महत्त्व

श्री सप्तशृंग निवासिनी देवी ही सह्याद्रीच्या सात डोंगराच्या कुशीत वसलेली असून, ते सात डोंगर म्हणजे मधू, कैटभ, शुंभ, निशुंभ, चंड व महिषासूर असून या राक्षसांचा विनाश करून श्री भगवतीने सृष्टीतील सर्व चराचरांना अभय, वरद प्रदान केले. या सात राक्षसांचे अस्तित्व सृष्टीतील प्रत्येक मनुष्याच्या अंतरात असतात. त्यात काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर व अहंकार आदींचा समावेश होतो.

पूजन विधी
या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे. देवीची आराधना करावी आणि नंतर विधीपूर्वक देवीची पूजा करावी. देवीची स्थापना करुन पूजा आणि आरती करावी. देवीला ताजे फळं आणि भाज्यांचे नैवेद्य दाखवावे आणि गंगा जल शिंपडावे. नंतर मंदिरात जाऊन प्रसाद दाखवावा आणि गरजू लोकांना दान करावे. या दिवशी शाकंभरी देवीची कथा करावी.

या मंत्राने करा जप
शाकंभरी पौर्णिमेला शुभ मंत्र जपणे फलदायी मानले गेले आहे. या दिवशी ‘शाकंभरी नीलवर्णानीलोत्पलविलोचना। मुष्टिंशिलीमुखापूर्णकमलंकमलालया।।’ या मंत्राचा जप करावा.

Gupt Navratri 2022 | माघ गुप्त नवरात्र म्हणजे नक्की काय? जाणून घ्या तिचे महत्त्व

Astro Tips | लग्न जमत नाहीय? लग्नात येणारे अडथळे दूर करण्यासाठी ‘ही’ माळ उपयोगी पडेल, जाणून घ्या रंजक माहिती

Paush Purnima 2022: पौष पौर्णिमेचे महत्त्व काय ? जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत