आयुष्य हे कधीच सोप्पं नसतं. जीवनाला अनेक गुंतागुंतीचे पदर असतात. आपल्या सभोवतालचे लोक विविध स्वभाव आणि गुणांनी भरलेले असतात. अशा परिस्थितीत आचार्य चाणक्यांनी काही लोकांशी कसे वागावे, त्यांच्याशी कसा व्यवहार करावा आणि मित्र बनवताना काय लक्षात ठेवावे याबद्दल काही महत्वपूर्ण मार्गदर्शन केले आहे. चाणक्यांचं हे मार्गदर्शन जीवनात अंगीकारल्यास आपण नको त्या व्यक्तींना आपल्या आयुष्यापासून दूर ठेवू शकतो.
१. मूर्खांशी वाद घालू नका
आचार्य चाणक्य सांगतात की, मूर्ख व्यक्तींशी वाद घालू नका. त्यांच्यात विचार करण्याची क्षमता कमी असते. त्यामुळे त्यांच्याशी वाद घालून वेळ आणि ऊर्जा वाया जाते. या व्यक्तींना चुकीचे आणि योग्य काय हे समजत नाही. त्यांच्याशी वाद घालणे केवळ मानसिक ताण निर्माण करेल. त्यामुळे मूर्ख लोकांपासून जितके लांब राहता येईल तितकेच उत्तम.
२. अविश्वासूंशी मैत्री नकोच
काही लोक तुमच्याशी बसून बोलतात, परंतु तुमच्या महत्वाच्या गोष्टी किंवा चिंता, कळकळीशी त्यांना किंचितही घेणंदेणं नसतं. या प्रकारच्या व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. हे लोक कधीही तुमच्या पाठीमागे धोका देऊ शकतात. अशा लोकांपासून सावध रहा आणि त्यांच्याशी तुमच्या व्यक्तिगत गोष्टी शेअर करणे टाळा, असं चाणक्य आवर्जुन सांगतात.
३. त्यांच्याशी मैत्री नको
आपल्यापेक्षा उच्च आणि नीच दर्जाच्या लोकांशी मैत्री करणे योग्य नाही. उच्च दर्जाच्या व्यक्तींशी मैत्री केल्यास आपल्याला स्वतःच कमीपणाची भावना येऊ शकते, तर नीच दर्जाच्या लोकांसोबत राहिल्यास आपल्या जीवनात सतत संघर्ष आणि अडचणी येतील. दोन्ही प्रकारच्या लोकांपासून दूर राहून, समतोल आणि सकारात्मक मैत्री करा.
४. पडती बाजू शेअर करु नका
प्रत्येक व्यक्तीला काही मर्यादा असतात, प्रत्येकाच्या काही पडत्या बाजू असतात, परंतु ते आपल्या जवळच्या लोकांसोबतही खूपच विचारपूर्वक शेअर करावं. आपल्या वैयक्तिक गोष्टी इतरांसोबत शेअर केल्यास ते लोक त्याचा फायदा घेत जाऊ शकतात. आपल्या अशा गोष्टींना गुप्त ठेवा, जेणेकरून त्यांचा वापर इतर लोक न करता तुम्हाला अपयशी ठरवू शकतील, असं चाणक्य स्पष्टपणे सांगतात.
५. मूर्खांच्या बदनामीला घाबरु नका
सर्व लोकच आपल्याला चांगले समजतात या भ्रमात राहू नका. काही लोक तर आपली खोटी बदनामी करत असतात. अशावेळी तुम्ही मूर्ख लोकांच्या बोलण्यामुळे खचून जाऊ नका. त्यांच्याशी वाद घालण्यापेक्षा शांतपणे जीवन जगा. मूर्ख लोकांच्या पुढे तुम्ही काय करणार? त्यांचा पिंजरा ओलांडून आपलं जीवन पुढे चालवा.