मुंबई : सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे. भक्त या दिवशी आपल्या स्वामीला प्रसन्न करण्यासाठी विविध मार्गांनी प्रयत्न करतात. या दिवशी भगवान शिवाची पूजा केली जाते. असे म्हणतात की पिंडीवरती भरपूर पाणी अर्पण केल्यानेही शिव प्रसन्न होतो आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देतो. यामुळेच सोमवारी सकाळी उठल्यावर भगवान शंकराचे दर्शन घेतल्यानंतर शिवाचे परायण तुम्ही करु शकता. सोमवारी मनापासून पूजा केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि जीवनातील सर्व समस्या आपोआप दूर होतात. अशा वेळी सोमवारी दूध अर्पण करण्याचेही स्वतःचे महत्त्व आहे. चला तर मग जाणून घेऊयात सोमवारी दुध अर्पण करण्याचे फायदे.
सोमवारी कोणत्याही शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर कच्चे दूध अर्पण करावे. हे 5 किंवा 7 सोमवारी करा. असे केल्याने कुंडलीतील ग्रह दोष दूर होतात असे मानले जाते. एवढेच नाही तर मनाने केलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होते.
डोळ्यातील दोष टाळण्यासाठी रविवारी रात्री 1 ग्लास दुध शेजारी ठेवून झोपा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करून कोणत्याही बाभळीच्या झाडाच्या मुळाशी हे दूध टाकावे. यामुळे दृष्टीचा दोष दूर होतो.
जर कोणाला वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल किंवा वैवाहिक जीवनात काही अडथळे येत असतील तर त्या व्यक्तीने सोमवारी सकाळी शिवाच्या मंदिरात गौरी-शंकर रुद्राक्ष अर्पण करावे. तसेच, तुम्ही तुमचे मन परमेश्वराला सांगावे.
जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची पैशाची समस्या येत असेल तर प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर दुधात पाणी मिसळून अर्पण करा. एवढेच नाही तर रुद्राक्षाच्या माळाने ओम सोमेश्वराय नमः चा १०८ वेळा जप करा. पौर्णिमेला दूधमिश्रित पाण्याने चंद्राला अर्घ्य अर्पण करावे. असे केल्याने भगवान भोले भंडारी जीवनातील प्रत्येक संकट दूर करतात आणि जीवनात सुख-संपत्तीचा वर्षाव होतो.
इतर बातम्या
रुद्राक्षाचे हे लाभ तुम्हाला माहितीयेत का? जाणून घ्या त्याचे चमत्कारिक फायदे