मुंबई : वर्षातली पहिली अमावस्या उद्या म्हणजेच 20 फेब्रुवारी 2023 रोजी साजरी केली जाईल. ही अमावस्या सोमवारी येत असल्याने या अमावस्येला सोमवती अमावस्या (Somwati Amavashya 2023) असंही म्हणतात. हिंदू पंचांगानुसार सध्या माघ महिना सुरु आहे आणि सोमवती अमावस्येनंतर म्हणजेच मंगळवारी फाल्गुन महिन्यात आपण पदार्पण करणार आहोत. या दिवशी स्नान आणि दान यांचे विशेष महत्त्व असल्याचे मानले जाते. अमावस्या तिथीला नदीत स्नान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते असे म्हणतात. या दिवशी पितरांची पूजा केल्याने शांती आणि सौभाग्य प्राप्त होते. या दिवशी पितरांना प्रसन्न केल्याने शुभफळ प्राप्त होतात, अशी मान्यता आहे. या दिवशी केलेल्या काही उपायांमुळे पितृदोषातूनसुद्धा मुक्ती मिळेते.
ज्योतिषशास्त्रानुसार, पूर्वजांच्या आशीर्वादाने व्यक्तीसाठी प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतात. यासोबतच कुटुंबात सुख-शांती नांदते. असे मानले जाते की पितरांच्या कोपामुळे आपल्याला अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे घरात कलह व वाद निर्माण होऊन व्यक्तीच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात.
ज्योतिषशास्त्रानुसार, सोमवती अमावस्येला काही गोष्टींची काळजी घेतल्यास वंशजांच्या प्रगतीचा मार्ग खुला होतो. जाणून घ्या सोमवती अमावस्येला कोणकोणत्या कर्मांमुळे पितरांच्या नाराजीला सामोरे जावे लागते.
अमावस्या हा वर्षातील सर्वात शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो. यामुळेच या दिवशी अनेक महत्त्वाचे विधी आणि अनेक परंपरा पाळल्या जातात.
सोमवती अमावस्येच्या दिवशी कोणत्याही पवित्र नदीत स्नान केल्याने कुटुंबात सुख-समृद्धी येते. दान करणे देखील खूप फलदायी मानले जाते.
हिंदू धर्मग्रंथानुसार अमावस्या हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. सोमवती अमावस्येला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की सोमवती अमावस्येच्या दिवशी उपवास केल्याने स्त्रियांमधील वैधव्य आणि संततीची अनिश्चितता दूर होते. या दिवशी सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात.
या दिवशी नदीच्या काठावर दक्षिण दिशेला तोंड करून पाण्यात तीळ घालून ते पितरांना विधिवत अर्पण करावे. जर कोणत्याही पूर्वजांचे विधी नीट झाले नसेल तर पिंडदान करून मुक्त करावे. सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी तर्पण, पिंड दान किंवा श्राद्ध कर्म केल्याने पितर आनंदी होतात आणि त्यांच्या वंशजांना सुख, समृद्धी, संपत्ती आणि वृद्धी आणि आनंदी जीवनाचा आशीर्वाद देतात.
या दिवशी पिंपळाच्या वृक्षाची पूजा करावी, कारण असे मानले जाते की पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवता वास करतात, म्हणून या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या पितरांचा आशीर्वाद आणि पापांपासून मुक्ती मिळते. पिंपळाच्या झाडाची 108 परिक्रमा करून पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करावी.
अमावस्येच्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार असहाय किंवा गरीबांना दान करा. मंदिरात प्रत्यक्ष दान (पीठ, मसूर, तूप, धान्य, साखर, मिठाई) केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात. या दिवशी गरीब आणि गरजूंना ब्लँकेट, आवळा, तिळाचे तेल, तिळाचे लाडू इत्यादी दान करा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)