मुंबई : आषाढी एकादशी म्हटलं की पंढरपूरमधलं (Pandharpur) विलोभनिय दृष्य डोळ्यासमोर उभं राहातं. लाखो वारकरी, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेली भक्तमंडळी, छोट्या-मोठ्या दुकानांची गर्दी अन् एकच विठ्ठल नामाचा गजर… आषाढी एकादशीसाठी राज्यभरातून लाखो वारकरी (Warkari) पायी चालत पंढरपूरची वारी (Pandharpur Wari) करतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजे आषाढी एकादशी… यंदा आषाढी एकादशी 10 जुलैला (Ashadi Ekadashi 2022 Date) आहे. हे सगळं वातावरण अनुभवण्यासाठी तुम्हीही जाऊ शकता. त्यासाठी रेल्वेने विशेष सुविधा उपलब्ध करून दिली. आहे. आषाढी एकादशीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या सुटणार आहेत.
मध्य रेल्वेने पंढरपूरच्या आषाढी एकादशीसाठी स्पेशल गाड्या सुरू केल्या आहेत. त्या 5 ते 14 जुलैदरम्यान चालवण्यात येणार आहेत. या ट्रेन नागपूर सोलापूर- लातूर – अमरावती – मिरज – खामगाव ते पंढरपूर, मिरज- कुडूवाडी दरम्यान चालवल्या जातील. जादा फेऱ्या सोडल्या आहेत. त्यांचं आरक्षण सुरू झालं आहे.
ट्रेन क्र. 01109/10 : लातूर- पंढरपूर (12 फेऱ्या)
मिरज – कुर्डुवाडी पूर्णपणे अनारक्षित विशेष (20 फेऱ्या)
ट्रेन क्र. 01112/13 डेमू विशेष : पंढरपूर – मिरज विशेष (8 फेऱ्या)
ट्रेन क्र. 01115/16 नागपूर- मिरज विशेष (फेऱ्या)
ट्रेन क्र. 01117/18 : नागपूर – पंढरपूर विशेष (4 फेऱ्या)
ट्रेन क्र. 01119/20 : अमरावती- पंढरपूर विशेष (4 फेऱ्या)
ट्रेन क्र. 01121 /22 : खामगाव – पंढरपूर विशेष (4 फेऱ्या)
दुपारी पावसाने लावलेली हजेरी तसेच सायंकाळी टाळ मृदगांचा गजरात विठुरायाच्या जयघोषात संत तुकाराम महाराज पालखीचे वरवंडमध्ये भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. कोरोनामुळे दोन वर्ष या सोहळ्याला विराम लागला होता त्यामुळे यंदा पालखीच्या दर्शनासाठी वरवंड वासियांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. परंपरेनुसार वरवंडमध्ये पालखी सोहळा दाखल झाला की कायमच पालखी सोहळ्याचे स्वागतासाठी वरून राजाने लावली हजेरी आहे. यामुळे वारकरी आणि ग्रामस्थ सुखावले.
सासवड येथील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काल जेजुरी येथे दाखल झाली . पालखीचा मुक्काम काल जेजुरीतच होता. सोन्याच्या जेजुरीत भंडाऱ्यासोबत गुलालाचा रंग उधळला गेला. ज्ञानोबा माऊलींच्या पालखीने, भक्तांच्या हरीनामाच्या गजराने जेजुरी गड आणि जेजुरी नगरी अवर्णनीय दिसते आहे. दोन वर्षांनंतर माऊलींचा पालखी सोहळा पंढरीला जात असल्याने सोहळ्यात राज्यभरातून लाखो भाविक सहभागी झाले आहेत. नेहमीपेक्षा सोहळ्यात वारकऱ्यांची मोठी गर्दी असल्याने जेजुरीतील सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते.