Horoscope 11 May 2022 : मानसिक ताण वाढण्याची शक्यता, आरोग्य उत्तम राहिल

| Updated on: May 11, 2022 | 5:05 AM

आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल ? आजचे तारे काय सांगतात. दैनिक राशी भविष्याद्वारे आजचे राशी भविष्य आणि दिवसातील घडामोडीची माहिती जाणून घ्या.

Horoscope 11 May 2022 : मानसिक ताण वाढण्याची शक्यता, आरोग्य उत्तम राहिल
Follow us on

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची रास त्याच्या जन्मतारीख आणि जन्मवेळेवर आधारित असते. ज्योतिषशास्त्रात (Astrology) 27 नक्षत्र, 9 ग्रह आणि 12 राशींचे वर्णन केले आहे. याआधारावर व्यक्तीची रास (Zodiac) ठरवली जाते. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? आजचे तारे काय म्हणतात? दैनिक राशिभविष्याद्वारे आजचे राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडींची माहिती जाणून घेवूया.हे राशीभविष्य (Horoscope) वाचून तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकाल. आज तुम्हाला कोणत्या आव्हानां (Challenge)चा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. दैनंदिन राशीभविष्य वाचून तुम्ही परिस्थितीसाठी तयार होऊ शकता.

कर्क –

आजच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल. स्वतःसाठी काहीतरी नवीन करण्याची तुमची इच्छा देखील पूर्ण होईल. नशिबाचा तारा मजबूत आहे. तुमचा कामाबद्दलचा उत्साह तुम्हाला नक्कीच यशस्वी करेल. प्रिय व्यक्तीसोबत भेटही होईल.
परंतु घाईघाईत कोणताही चुकीचा निर्णय घेतल्यास अडचणी निर्माण होतील. वेळ अतिशय काळजीपूर्वक घालवावा लागेल.
तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी मिळतील. जे अधिक आत्मविश्वास निर्माण करतील. पार्टनरशीप व्यवसायाशी संबंधित निर्णय घेणे देखील यावेळी फायदेशीर ठरेल. परंतु कोणत्याही व्यावसायिक पक्षाकडून नुकसान होण्याचीही शक्यता आहे.

लव फोकस – किरकोळ गैरसमजामुळे पती-पत्नीच्या नात्यात तणाव निर्माण होईल. मात्र परस्पर समंजसपणाने समस्याही सुटतील. .

खबरदारी – मानसिक ताण कधीही वाढू शकतो. शांत राहण्याचा प्रयत्न करा आणि काही वेळ ध्यानातही घालवा.

शुभ रंग – नीळ

भाग्यवान अक्षर –

अनुकूल क्रमांक – 1

सिंह –

आज ग्रहस्थिती अनुकूल आहे. तुम्‍ही तुमच्‍या कामाला सर्वोत्‍तम मार्गाने प्रारूप देऊ शकाल. जवळच्या व्यक्तीशी भेट होईल आणि महत्त्वाच्या विषयावरही चर्चा होईल. धार्मिक संस्थेतील सेवेशी संबंधित कामातही योग्य वेळ जाईल.
व्यवसायात तुम्ही केलेले नवीन प्रयोग फायदेशीर ठरतील. तुमच्या कामासाठी तुम्ही केलेल्या मेहनतीचे उत्तम फळ तुम्हाला मिळेल. पण तुमच्या महत्त्वाच्या फाइल्स आणि कागदपत्रे अतिशय सुरक्षित ठेवा. अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता.

लव फोकस – जोडीदाराची साथ तुमच्यासाठी खपू सुखद असेल. नको त्या प्रेमप्रकरणांपासून दूर रहा.

खबरदारी – आरोग्य चांगले राहिल. तुमची इम्युनिटी सिस्टीम स्ट्रांग ठेवण्यासाठी दिनक्रम चांगला ठेवा.

शुभ रंग – लाल

भाग्यवान अक्षर –

अनुकूल क्रमांक – 2

कन्या –

यावेळी नशीब आणि परिस्थिती तुमच्यासाठी सर्वोत्तम वेळ निर्माण करतेय. सामाजिक आणि व्यावसायिक दोन्ही ठिकाणी वर्चस्व कायम राहील. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही तुमचे काम पूर्ण करू शकाल.
मालमत्तेच्या खरेदी-विक्रीचे काम अतिशय काळजीपूर्वक करा. कारण सध्या या कामांसाठी परिस्थिती अनुकूल नाही. अनावश्यक खर्चही वाढतील. परदेशा संबंधित कोणतीही योजना आखली जात असेल तर ती सध्या पुढे ढकलणे उचित आहे
तुमच्या कोणत्याही कामात घरातील अनुभवी आणि वरिष्ठांचा सल्ला घ्या, त्यांचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

लव फोकस – पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येईल. पण मित्रामुळे घरात काही नकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकते, हे लक्षात ठेवा.

खबरदारी – आरोग्य उत्तम राहील. पण तुमची दिनचर्या व्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे.

शुभ रंग – सफेद

भाग्यवान अक्षर –

अनुकूल क्रमांक – 9