हिंदू (Hindu) धर्मात प्रत्येक दिवसाचे एक वेगळं महत्त्व असून प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला (God) समर्पित आहे. मान्यतेनुसार जो दिवस ज्या देवाला समर्पित आहे. त्या दिवशी त्या देवाची उपासना केली पाहिजे. असं केल्यास देवाची कृपा लवकर लाभते. रविवार (Sunday) हा सूर्य देवासाठी समर्पित आहे. सूर्य देव हा असा एकमेव देव आहे ज्याचं आपल्याला रोज दर्शन होतं. सूर्य देवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात सूर्य देवाच्या व्रतास विशेष महत्त्व देण्यात आलंय. या दिवशी सूर्य देवाची विधिवत पूजा करून अर्घ्य दिला जातो. या दिवशी व्रत केल्यास व्यक्तीची शारीरिक पीडा दूर होत जीवनातील इतर संकटांचा नाश होतो. कुंडलीतील सूर्य मजबूत करण्यासाठी देखील सूर्य देवाचे व्रत करायला सांगितलं जातं.
शास्त्रानुसार 1 वर्षापर्यंत प्रत्येक रविवारी व्रत केल्यानं सर्व प्रकारच्या शारीरिक पीडांपासून व्यक्तीची मुक्ती होते. 30 किंवा 12 व्रत करण्याचे देखील विशेष लाभ आहेत. सूर्याचे व्रत केल्याने शरीर निरोगी राहते. यासह अशुभ फळाचे शुभ फळात रूपांतर होते. या दिवशी व्रतकथा ऐकल्याने व्यक्तीची सर्व मनोकामना पूर्ण होते. सोबतच मान-सन्मान, धन-यश तसेच उत्तम स्वस्थ लाभते.
हे व्रत सुरु करण्याआधी किती व्रत करणार हा संकल्प करणे गरजेचे आहे. त्यानंतर येणाऱ्या रविवारपासून व्रतास सुरुवात करावी. रविवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून लाल रंगाचे कपडे घालावे. त्यानंतर सूर्य मंत्राचा जप करावा. जप पूर्ण झाल्यानंतर सूर्य देवाला गंध, तांदूळ, दूध, लाल फूल आणि जल अर्घ्य देत पूजन करावे. सूर्यास्तानंतर भोजन करावे भोजनात गव्हाची पोळी किंवा गव्हाची खीर, गूळ, दूध, दही आणि साजूक तुपाचा वापर करावा. भोजनात मिठाचा वापर करू नये. सूर्यास्तानंतर चुकूनही मीठ खाऊ नये.
– सूर्य देवाची कृपा लाभण्यासाठी रविवारी तेल आणि मिठाचे सेवन करू नये.
– या दिवशी मांसाहार आणि मद्य यापासून दूर राहावे.
– रविवारी केस कापू नये. यासह रविवारी तेलाने मालिश देखील करू नये.
– तांब्याच्या वस्तूची खरेदी किंवा विक्री करू नये.
– निळा, काळा, आणि करड्या रंगाचे कपडे घालू नये. यासह शक्य असल्यास बूट घालणे देखील टाळावे.
– यासह या दिवशी दूध जळणार नाही याची काळजी घ्या.
(टीप – या लेखात दिलेल्या माहितीचं आम्ही समर्थन करत नाही. याचे कुठलेही पुरावे नाहीत.अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधावा)