मुंबई : सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना असून धार्मिकदृष्ट्या मात्र ही अशुभ घटना मानली जाते. सूर्य ग्रहणाला घेऊन अनेक मिथक आहेत. 4 डिसेंबर 2021 रोजी या वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण होणार आहे. हिंदू पुराणामध्ये या दिवशी काय करावे किंवा काय करु नये हे सांगण्यात आले आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.
जेव्हा चंद्र भ्रमंती करत पुथ्वी आणि सुर्याच्यामध्ये येतो तेव्हा चंद्रमुळे सुर्य पूर्णपणे झाकोळला जातो . या खगोलीय घटनेला सुर्यग्रहण म्हणतात. या घटनेमुळे आवकाशात सर्वत्र अंधार पसरतो. या वर्षी डिसेंबर महिन्यात वर्षीचे शेवटचे सूर्यग्रहण होणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हे सूर्यग्रहण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरीका आणि अटलांटिक या भागातून दिसणार आहे. भारतामधून मात्र हे ग्रहण दिसले जाणार नाही.
?नेशनल एरोनॉटिक्स अॅन्ड स्पेस अॕडमिनिस्ट्रेशन (NASA) च्या मते, या दिवशी लोकांना सावध राहण्याची जास्त गरज आहे. डोळ्यांच्या सुरक्षतेसाठी खुल्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये. जर ग्रहण पाहायचे असल्यास ‘एक्लिप्स ग्लास’चा वापर करावा.
?ग्रहण पाहण्यासाठी घरी बनवलेल्या कोणताही चष्मा वापरु नये. यामुळे डोळ्यांच्या नसांना त्रास होऊ शकतो.
?कंकणाकृती ग्रहण हा सर्वात सुंदर अनुभव असतो . अनेक जण या क्षणाला त्यांच्या कॅमेरामध्ये कैद करण्यासाठी उत्सुक असतात. पण नासा या गोष्टीच्या विरोधात आहे. तेथे आपल्या फोनमधील किरणांचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो.
?तुम्ही दररोज वापरत आसणाऱ्या चष्मावर खगोलीय चश्मावापरुन तुम्हा ग्रहण पाहू शकता. यामुळे तुमच्या डोळ्यांना कमी ईजा होईल.
?या दिवशी वाहन चालवताना जास्त लक्ष देणे गरजेचे असते. वाहनाच्या वेगावर आपण नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे असते.
टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.
इतर बातम्या
चमत्कारिक तुळशीचे पाणी, नोकरी-व्यवसायात प्रगती, आजारातून मुक्त होण्यास होईल मदत