Marathi News Spiritual adhyatmik Surya Grahan 2021 Know what pregnant women should and should not do during solar eclipse know more about this
Surya Grahan 2021 | सूर्यग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी या 4 गोष्टी करूच नये
हिंदू धर्मात ग्रहण या शब्दाला घेऊन अनेक मान्यता आहेत. त्यातील एक मान्याता म्हणजे गर्भवती महिलांची या काळात जास्त काळजी घ्यावी लागते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.
Surya-Grahan-Pregnancy
Follow us on
मुंबई : उद्या शनिवार, ४ डिसेंबर रोजी या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण होणार आहे. हे ग्रहण सकाळी 10:59 वाजता सुरू होईल आणि दुपारी 03:07 वाजता संपेल. हिंदू धर्मात ग्रहण या शब्दाला घेऊन अनेक मान्यता आहेत. त्यातील एक मान्याता म्हणजे गर्भवती महिलांची या काळात जास्त काळजी घ्यावी लागते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.
गर्भवती महिलांनी या काळात काय करायचं?
ग्रहणकाळात गर्भवती महिलांनी घरातच राहावे.
गरोदर महिलांनी सूर्यग्रहणाच्या वेळी जागे राहून पूजा किंवा मंत्रांचा जप करत राहावे.
ग्रहण संपल्यानंतर सूर्यग्रहणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी त्यांनी स्नान करावे.
गर्भवती महिलांनी सूर्यग्रहण काळात अन्न खाऊ नये कारण ते निषिद्ध मानले जाते. मात्र, मुलाचे आरोग्य लक्षात घेऊन ती फळे खाऊ शकते.
त्यांनी कात्री, चाकू, पिन इत्यादी धारदार वस्तू वापरणे टाळावे, कारण यामुळे जन्मजात दोष होऊ शकतात.
सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्याकडे न पाहण्याचा सल्ला दिला जातो कारण त्यात हानिकारक किरण असतात ज्यामुळे डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो.
दरम्यान, अंतिम सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, परंतु दक्षिण अमेरिका, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, चिली, नामिबिया आणि जगाच्या इतर भागांमध्ये ते दिसेल.
सूर्यग्रहणाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाच वेगळे टप्पे असतात. वैश्विक घटनेचा पहिला टप्पा म्हणजे आंशिक ग्रहणाची सुरुवात, दुसरा टप्पा संपूर्ण ग्रहण असतो.
ग्रहणाच्या वेळी वातावरण दुषित होते. त्यामुळे एक प्रकारची नकारत्मता पसरते. त्यामुळे तुम्ही या सर्व गोष्टींचे पालन केलेच पाहिजे जेणेकरून तुमच्या जन्मलेल्या बाळावर कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होणार नाही किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.
(येथे दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)