Surya Mantra Remedies : कुंडलीतील सूर्याचे स्थान मजबूत करण्यासाठी या मंत्रांचा जप करा, नशीब उजळेल

| Updated on: Aug 01, 2021 | 9:25 AM

ज्योतिषशास्त्रात सूर्यदेव सर्व ग्रहांचा राजा मानला जातो. मान्यता आहे की जर सूर्य देव व्यक्तीच्या कुंडलीत शुभ परिणाम प्रदान करेल तर समाजात त्याची कीर्ती आणि आदर वाढतो. त्याला नेहमीच त्याच्या वडिलांचा आशीर्वाद मिळतो. जेव्हा सूर्य कमकुवत असतो तेव्हा त्याच्यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव असतो.

Surya Mantra Remedies : कुंडलीतील सूर्याचे स्थान मजबूत करण्यासाठी या मंत्रांचा जप करा, नशीब उजळेल
Lord Surya
Follow us on

मुंबई : ज्योतिषशास्त्रात सूर्यदेव सर्व ग्रहांचा राजा मानला जातो. मान्यता आहे की जर सूर्य देव व्यक्तीच्या कुंडलीत शुभ परिणाम प्रदान करेल तर समाजात त्याची कीर्ती आणि आदर वाढतो. त्याला नेहमीच त्याच्या वडिलांचा आशीर्वाद मिळतो. जेव्हा सूर्य कमकुवत असतो तेव्हा त्याच्यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव असतो. व्यक्तीला डोळ्यांशी संबंधित अनेक प्रकारचे त्रास उद्भवतात. त्याला कार्यक्षेत्रातील उच्च अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळत नाही. त्याचबरोबर त्याचे वडिलांशी असलेले संबंध दिवसेंदिवस खराब होत जातात. जर सूर्य देव तुमच्या कुंडलीत शुभ परिणाम देत नसेल, तर केवळ रविवारीच नाही जो सूर्यदेवाचा दिवस आहे, परंतु दररोज स्नान केल्यावर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करुन जपासह, खालील मंत्रांचे पठण केल्याने त्यांचे आशीर्वाद मिळू शकतात (Surya Mantra Remedies To Make Sun More Powerful In Your Kundali).

सूर्य गायत्री मंत्र

“ॐ आदित्याय विदमहे प्रभाकराय धीमहितन्न: सूर्य प्रचोदयात् ।।”

सूर्याचा प्रार्थना मंत्र –

ग्रहाणामादिरादित्यो लोक लक्षण कारक:।

विषम स्थान संभूतां पीड़ां दहतु मे रवि।।

या मंत्राचा जप केल्याने सूर्य देव लवकरच प्रसन्न होतात आणि त्याच्या कृपेने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

या मंत्राने सूर्यदेवाची उपासना करा –

नमो नमस्तेस्तु सदा विभावसो, सर्वात्मने सप्तहयाय भानवे।

अनंतशक्तिर्मणि भूषणेन, वदस्व भक्तिं मम मुक्तिमव्ययाम्।।

सूर्यदेवाचा तंत्रोक्त मंत्र –

“ॐ ह्रां ह्रीं ह्रौं स: सूर्याय नम:।

जप संख्या –

7,000 जाप

कुंडलीमधील सूर्यदोष दूर करण्याचा मंत्र –

जपाकुसुम संकाशं काश्यपेयम् महाद्युतिम्।

तमोरिं सर्वपापघ्नं प्रणतोस्मि दिवाकरम्।।

ग्रहणामादिरादित्यो लोक लक्षण कारक:।

विषम स्थान संभूतां पीड़ां दहतु में रवि:।।

सूर्यदेवाच्या पूजेसाठी सकाळी हे वाचा –

सूर्यदेव! मैं सुमिरौ तोही। सुमिरत ज्ञान–बुद्धि दे मोही।।

तुम आदित परमेश्वर स्वामी। अलख निरंजन अंतरजामी।।

ज्योति–प्रताप तिहूं पुर राजै। रूप मनोहर कुंडल भ्राजै।।

नील वर्ण छबि तुम असवारी। ज्ञान निधान धरम व्रतधारी।।

एक रूप राजत तिहुं लोका। सुमिरत नाम मिटै सब सोका।।

नमस्कार करि जो नर ध्यावहिं। सुख–संपति नानाबिधि पावहिं।।

दोहा– ध्यान करत ही मिटत तम उर अति होत प्रकास।।

जै आदित सर्वस्व सिव देहु भक्ति सुखरास।।

सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही श्री सूर्यस्तवराज आणि सूर्यशास्त्रोत्रमसोबत या चौपाई आणि मंत्रांचे पठण करु शकता.

Surya Mantra Remedies To Make Sun More Powerful In Your Kundali

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

श्रावण महिन्यात सुवासिनींनी या 6 गोष्टी कराव्यात; अखंड सौभाग्यप्राप्ती होते !

Sawan 2021 : अतिशय कल्याणकारी आहे भगवान शंकराचा हा महान मंत्र, जप केल्यास दूर होतात सर्व दुःख