मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची रास त्याच्या जन्मतारीख आणि जन्मवेळेवर आधारित असते. ज्योतिषशास्त्रात (Astrology) 27 नक्षत्र, 9 ग्रह आणि 12 राशींचे वर्णन केले आहे. याआधारावर व्यक्तीची रास (Zodiac) ठरवली जाते. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? आजचे तारे काय म्हणतात? दैनिक राशिभविष्याद्वारे आजचे राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडींची माहिती जाणून घेवूया.हे राशीभविष्य (Horoscope) वाचून तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकाल. आज तुम्हाला कोणत्या आव्हानांचा (Challenge) सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. दैनंदिन राशीभविष्य वाचून तुम्ही परिस्थितीसाठी तयार होऊ शकता.
आजचा दिवस काही संमिश्र परिणाम घेऊन येत आहे. कोणत्याही संपर्कातून महत्त्वाची बातमी मिळेल. जे तुमच्या भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.
दुपारनंतर परिस्थिती काही प्रतिकूल वातावरण निर्माण करू शकते. तुमच्यासमोर कोणते तरी नवे संकटं उभी राहतील आणि कामाच्या दबावामुळे तुम्हाला अडकल्यासारखे वाटेल हे चांगले नाही. कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थी वर्गाला अधिक मेहनत घ्यावी लागेल.
कामाच्या ठिकाणी काही महत्त्वाच्या लोकांशी लाभदायक भेट होईल. ज्याद्वारे तुम्हाला मोठ्या ऑर्डर्स देखील मिळतील. पण वेळेत काम पूर्ण करणं हे तुमच्या क्षमतेवर अवलंबून असतं. काही महत्त्वाची जबाबदारी सरकारी नोकरीवाल्यांवर ही येऊ शकते.
लव फोकस – घरामध्ये योग्य वेळ न दिल्याने जोडीदाराची नाराजी सहन करावी लागू शकते.
खबरदारी – ब्लड प्रेशर आणि डायबेटिसची तपासणी करून घ्या. तुमच्या दिनचर्येत योग आणि व्यायामाचा समावेश करा.
शुभ रंग – आकाशी
भाग्यवान अक्षर – अ
अनुकूल क्रमांक – 5
एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी तुमची भेट होईल. आणि त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक अडचणी दूर होतील. मनोरंजक आणि माहितीपूर्ण साहित्य वाचण्यातही वेळ जाईल. जुन्या मित्रांसोबतच्या संवादामुळे जुन्या आठवणी ताज्या होतील.
जवळच्या नातेवाईकांच्या आरोग्याची बामती ऐकून मन उदास राहू शकते. दाखविण्याच्या बहाण्याने कर्ज घेणे टाळा, कारण त्याची परतफेड करणे कठीण होईल. मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होईल. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
करिअरशी संबंधित समस्या बर्याच अंशी सुटतील. आणि तुम्ही तुमच्या युक्तीने नकारात्मक परिस्थितींवर मात कराल. नोकरीत टार्गेट पूर्ण न झाल्यामुळे कार्यालयीन कामे घरीही करावी लागू शकतात.
लव फोकस – मुलांच्या कोणत्यातरी समस्येबद्दल चिंता राहिल. परस्पर समंजसपणाने समस्या सोडवणं चांगलं.
खबरदारी – जास्त कामामुळे मानदुखीची समस्या निर्माण होईल. व्यायामासाठीही थोडा वेळ काढा.
शुभ रंग – नीळा
भाग्यवान अक्षर – स
अनुकूल क्रमांक – 6
तुमचे व्यक्तिमत्व आणि जीवनशैली याबाबत अधिक जागरूक राहिल्याने तुम्ही अधिक आकर्षक दिसाल. समाजात तुमची प्रतिमा अधिक सुधारेल. जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी ठेवेल.
यावेळी पैशाशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. फसवणूक होऊ शकते. आर्थिक संकटातही अडकण्याची शक्यता. जमिनीची खरेदी-विक्री करताना कागदपत्रांची नीट तपासणी करा.
व्यवसायात तुमच्या कामाचा दर्जा आणखी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा. महत्त्वाची ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. यावेळी मार्केटिंग आणि कॉन्टॅक्ट पॉइंट्स बळकट करण्यासाठी थोडा वेळ द्या.
लव फोकस – बिझी शेड्युलमधून कुटूंबासाठी वेळ काढणं संबंध चांगले ठेवेल. कुटूंबात आनंदाचे वातावरण राहिल.
खबरदारी – आरोग्य चांगले राहिल. कसली चिंता करू नका. निष्काळजीपणा योग्य नाही.
शुभ रंग – हिरवा
भाग्यवान अक्षर – र
अनुकूल क्रमांक – 5