अहमदनगर जिल्ह्यातील ‘राजा विरभद्र’ महाराजांची बगाडाला लटकण्याची अनोखी परंपरा अबाधित
अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथील वीरभद्र यात्रेत नवसपूर्तीसाठी गळवंतीला अर्थात बगाडाला लटकण्याची अनोखी परंपरा शेकडो वर्षांपासून जपली जातेय. राहाता येथील ग्रामदैवत असलेल्या राजा विरभद्र महाराजांची यात्रा यावर्षी मोठ्या जल्लोषात साजरी केली गेलीय.
1 / 6
गेली दोन वर्ष कोरोनाच्या निर्बंधामुळे विरभद्र महाराजांची यात्रा साजरी होवू शकली नाही. मात्र गुढीपाडव्याला महाराष्ट्र निर्बंधमुक्त झाल्याने शिर्डी जवळील राहाता शहरात यात्रेचा मोठा उत्साह बघायला मिळाला. शेकडो वर्षांपासून सुरू असलेली परंपरागत यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरी झाली.
2 / 6
अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथील वीरभद्र यात्रेत नवसपूर्तीसाठी गळवंतीला अर्थात बगाडाला लटकण्याची अनोखी परंपरा शेकडो वर्षांपासून जपली जातेय. राहाता येथील ग्रामदैवत असलेल्या राजा विरभद्र महाराजांची यात्रा यावर्षी मोठ्या जल्लोषात साजरी केली गेलीय. या वेळी दोन हजारांहून अधिक भाविकांनी बगाडाला लटकत आपले नवस पुर्ण केले.
3 / 6
बिरोबा महाराज की जय असा जयघोष करत गळवंतीची मिरवणूक निघाली होती. या दिवशी डफांच्या तालावर मानाच्या काठ्या नाचवल्या गेल्या. गुलालाची मुक्त उधळण , फटाक्यांची आतिशबाजी असा नजारा यात्रेच्या रथ मिरवणुकीत दिसला.
4 / 6
भाविक डफाच्या तालावर तल्लीन झाले होते. विरभद्र महाराजांवर लाखो भाविकांची श्रद्धा आहे नवसाला पावणारा देव अशी ख्याती असलेल्या विरभद्राला हजारो लोक नवस करत असतात आणि इच्छापूर्ती झाली की गळवंतीला लटकून नवसपूर्ती केली जाते.
5 / 6
या यात्रेत एका हत्तीची प्रतिकृती तयार करून रथ बनवला जातो आणि रथाच्या दोन्ही बाजुला भाविकांना लटकवुन फेरी पुर्ण केली जाते.या वर्षी गळवंतीला लटकण्यासाठी हजारो महिला पुरूषांनी गर्दी केली होती. विशेष म्हणजे यात उच्चशिक्षीत तरूणींचा मोठा सहभाग होता. गेल्या दोन वर्षांपासून ही यात्रा बंद होती यावेळी मात्र महिला पुरूषांसह तरूणींनी गळवंतीला लटकून आपली नवसपूर्ती केलीय.
6 / 6
गळवंतीला लटकण्याची परंपरा शेकडो वर्षापासून जपली जातेय. अनेक महिला पुरूष आणि उच्चशिक्षित तरूणी यात सहभाग घेत असतात.आजपर्यंत कधीही गळवंतीला लटकून कोणता अपघात झाला नाही किंवा कोणी जखमी देखील झालं नाही हे विशेष. देवस्थान समीतीच्या वतीने गळवंतीला लटकणा-या भाविकांच्या सुरक्षेची विषेश काळजी घेतली जाते.दोन वर्षांनंतर यात्रा भरल्याने देवस्थान समीतीने मोठ्या उत्साहात यात्रेचे नियोजन केले होते.