हे परमेश्वरा… माझे चांगले दिवस कधी येतील… असं आपण कायम देवाला विचारत असतो. अनेकदा आपल्या काही इच्छा लगेच पूर्ण होतात. पण काही इच्छा पूर्ण होण्यासाठी मोठा कालावधी लागतो. अशात आपली इच्छा पूर्ण होत नसल्यास आपण दुःखी आणि हताश होतो आणि देवाने दिलेल्या काही संकेतांकडे दुर्लक्ष करतो. पण, तुम्हाला माहीत आहे का की, जेव्हा देव तुमची प्रार्थना ऐकतो, तेव्हा तो तुम्हाला काही संकेत देतो. याचं उत्तर प्रेमानंद जी महाराज यांनी दिलं आहे. जेव्हा देव प्रार्थना ऐकतो तेव्हा आपल्याला कोणते संकेत मिळू लागतात याबद्दल महाराजांनी सांगितलं आहे.
प्रेमानंद महाराज यांना एका भक्ताने प्रश्न विचारला की, देवाने आपची प्रार्थना ऐकली आहे… असं आम्हाला कधी कळेल?
महाराज भक्ताच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणाले, जेव्हा आपल्याला आनंदाचा अनुभव होता… याचा अर्थ देवाने आपली प्रार्थना ऐकली आहे.
प्रेमानंद महाराज पुढे म्हणतात, जेव्हा आपण देवाला प्रार्थना करतो तेव्हा आपलं मन शांत होतं. तुमचे शब्द भावनेने भरलेले असतील तरच देव ऐकेल आणि देव सर्वांचं ऐकतो. देव भावनाविरहित लोकांची हाक ऐकत नाही. जेव्हा आपण भावनेने हाक मारतो तेव्हा आपल्या भावनेतूनच उत्तर येतं.
महाराज म्हणतात की आम्ही आमची इच्छा काही सेकंदात पूर्ण झालेली पाहिली. पण, त्यासाठी एक योग्य वेळ ठरलेली आहे. जेव्हा आपल्याला असं वाटतं की देवाशिवाय आपल्याला कोणीही वाचवू शकत नाही. ही हाक लगेच देवाकडे पोहोचते… असं देखील महाराज म्हणाले.
यावेळा प्रेमानंद महाराजांनी एक उत्तम उदाहण देखील दिलं. एक व्यक्ती नशात दुचाकीवरून आला आणि आम्ही आनंदात देवाच्या दर्शनासाठी जात होतो. तेव्हा ती दुचाकी आमच्या पायाजवळ आली आणि थांबली… संकटकाळातही जेव्हा फक्त देवावर भरवसा असतो आणि फक्त देवालाच हाक मारतो तेव्हा त्याचे परिणाम एका सेकंदात दिसतात. देव कधीही फसव्या हाक ऐकत नाही, परंतु जेव्हा तुम्ही भक्तीने हाक मारता तेव्हा तुमची चूक झाली तरी देव तुम्हाला संकटातून वाचवतो.