शिवलिंगावर चुकूनही वाहू नये या पाच गोष्टी, नाही लाभत पुजेचे पूर्ण फळ

| Updated on: Dec 16, 2023 | 3:44 PM

महादेव हे आपल्या भक्तांवर अतिशय शिघ्र प्रसन्न होणारे देवता आहेत. ते केवल जल अभिषेकाने देखील आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात तसेच त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात. असे असले तरी महादेवाच्या पुजेत किंवा महादेवाला काही गोष्टी वाहणे शास्त्रात निशीद्ध सांगण्यात आले आहे. या कोणत्या गोष्टी आहेत ते आपण जाणून घेऊया.

1 / 5
हळद आणि कुंकू शिवाय इतर कुठलीही पूजा ही अपूर्ण असते. मात्र महादेवाच्या पुजेत हळद आणि कुंकू न वापरण्याचा सल्ला शास्त्रात दिला आहे.

2 / 5
तुळस ही भगवान विष्णूला अतिशय प्रिय आहे. मात्र शिवलींगावर चुकूनही तुळस वाहू नये. महादेवाच्या पिंडीवर तुळस वाहिल्याने भक्ताला महादेवाच्या कोपाचा सामना करावा लागतो.

3 / 5
लाल फुल हे भगवान विष्णू आणि देवीला अत्यंत प्रिय आहे, मात्र महादेवाच्या पुजेत लाल फुलं निषीद्ध सांगण्यात आले आहे. महादेवाला पांढरे फुल वाहिल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. महादेवासोबतच नंदीला देखील पांढरे फुल वाहावे.

4 / 5
प्रत्येकच देवाच्या पुजेत अक्षताला विशेष महत्त्व असते. महादेवाला देखील अक्षता वाहाण्याचा नियम आहे.  अक्षत वाहिल्याने पुजेत काही तृटी किंवा काही कमतरता राहिल्यास ती पूर्ण होते. मात्र महादेवाच्या पुजेत तुडलेले तांदूळ म्हणजेच अक्षता वापरू नये.

5 / 5
शंख हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र अणि शुभ मानल्या जातो. शंभ आणि घंटा पूजनाचे प्रत्त्येकच पूजेत विशेष महत्त्व आहे. महादेवाला जलाभिषेक करताना शंखाच्या पाण्याने अभिषेक करू नये.