या लोकांनी चुकूनही घालू नका चांदीचे दागिने, अन्यथा आयुष्यभर सहन करावा लागेल त्रास

| Updated on: Jan 03, 2025 | 3:52 PM

बरेच लोक चांदीच्या अंगठ्या किंवा इतर दागिने घालतात. खरे तर ज्योतिष शास्त्रात चांदीचे दागिने घालणे अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले जाते. चांदीचा सबंध थेट चंद्राशी आहे. चांदीचे दागिने घातल्याने चंद्राशी संबंधित समस्या कमी होतात. परंतु ज्योतिष शास्त्रात काही लोकांना चांदीचे दागिने घालण्यास मनाई करण्यात आली आहे . त्यामुळे कोणकोणत्या लोकांनी चांदीचे दागिने घालणे टाळावे ते जाणून घेऊ.

या लोकांनी चुकूनही घालू नका चांदीचे दागिने, अन्यथा आयुष्यभर सहन करावा लागेल त्रास
Follow us on

आज काल प्रत्येक जण अंगावर काही ना काही चांदीचे दागिने घालतो. चांदीच्या दागिन्याचे ज्योतिष शास्त्रात खूप महत्व आहे. चांदीच्या दागिने अंगावर घालणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की चांदीचे दागिने घातल्याने मन आणि मेंदू मजबूत होतो. तसेच कुंडलीतील येथील चंद्र मजबूत होतो.

चांदी धारण केल्याने बिघडते ग्रह आणि ताऱ्यांची स्थिती
चांदीचे दागिने घातल्याने जसे फायदे होतात तसेच त्यामुळे काही तोटे देखील होतात. ज्योतिष शास्त्रानुसार चांदीचे दागिने धारण केल्याने काही ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थिती बिघडतात. त्यामुळे चांदीचे दागिने घातल्याने फायदे न होता नुकसान होऊ लागते. त्यामुळे काही लोकांनी चांदीचे दागिने घालणे टाळले पाहिजे. जाणून घेऊया कोणत्या लोकांनी चांदीचे दागिने घालू नयेत.

या लोकांनी घालू नये चांदीचे दागिने

1. ज्योतिष शास्त्रानुसार जे लोक खूप भावनिक असतात किंवा खूप रागवतात अशा लोकांनी चांदीचे दागिने घालू नये. या लोकांनी चांदीचे दागिने घातली तर त्यांच्या भावना आणि राग दोन्ही वाढू लागतात.
2. चंद्राला लक्षात ठेवून चांदीचे दागिने अंगावर घातले जातात. ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्र 12 व्या किंवा 10 व्या घरात आहे त्यांनी चांदीच्या दागिने घालणे टाळावे.
3. वृषभ, मिथुन, कन्या, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांना ही ज्योतिष शास्त्रानुसार चांदीचे दागिने घालण्यास मनाई आहे.
4. ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये शुक्र, बुध आणि शनीचे वर्चस्व आहे त्यांनीही चांदीचे दागिने घालणे टाळावे.
5. ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्राचे वर्चस्व कमी असेल किंवा ज्यांचे मन नेहमी विचारात असते त्यांनी चांदीचे दागिने घालू नये. तसेच शांत स्वभावाच्या लोकांनी चांदीचे दागिने अजिबातच घालू नये.
6. ज्योतिषशास्त्रात देखील मेष, सिंह आणि धनु राशीच्या लोकांना चांदीचे दागिने घालण्यास मनाई आहे.
7. चांदीचे दागिने घालण्यापूर्वी कुंडलीतील चंद्र आणि इतर ग्रहांची स्थिती जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)