मुंबई : लग्न भारतीय संस्कृतीतील महत्त्वाची परंपरा आहे. दोन व्यक्ती पवित्र अग्नीच्या साक्षीने संपूर्ण आयुष्य एकत्र व्यतीत करण्यासाठी तयार होतात. भारतातील या परंपरेला आता पश्चिमात्य लोक देखील आत्मसाद करु लागले आहेत. पण जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती, त्यामुळेच काही लोकांना लग्न म्हणजे बंधन वाटते. तर काहींना संपूर्ण आयुष्य बदलवणारी घटना. राशीचक्रातील 12 राशींचा स्वभाव परस्परांपासून खूपच भिन्न आहे. या राशींपैकी 4 राशी लग्नासाठी नेहमीच तयार असतात. या राशींसाठी लग्न म्हणजे सर्वस्व असते. एखाद्यासाठी आपले जीवन समर्पित करण्याची भावना या राशींच्या व्यक्तींमध्ये असते. या राशी वैवाहिक जीवनाचा आनंद घेण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाहीत.
या राशीच्या लोकांना आयुष्यात स्थिरता महत्त्वाची असते. सुरक्षितेची भावना महत्त्वाची असते यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे लग्न. एकदा त्यांना योग्य व्यक्ती भेटला तर ते मागे हटत नाहीत. या राशीच्या व्यक्तींनी एकदा निर्णय घेतला तर ह्या व्यक्ती ते काम पूर्ण करतात. हे लोक अतिशय निष्ठावान असतात.
कर्क राशीचे लोक कुटुंबाभिमुख असतात, त्यांना त्यांच्या कुटुंबापुढे काहीही दिसत नाही. या राशीच्या व्यक्तींना जीवनातील सर्व चढ उतारांमध्ये त्यांच्या पाठीशी उभा राहणारा जोडीदार हवा असतो. त्यांच्या जोडीदारावर ते प्रचंड प्रेम करतात.
या राशीचे लोक वास्तववादीपेक्षा आदर्शवादी असतात. लग्न होण्याच्या संकल्पनेनेच ते आनंदी होतात. याशिवाय त्याला प्रेमाची कल्पनाही आवडते. या राशीच्या व्यक्तीला एका प्रमाणिक जोडीदाराची गरज असते. जर त्यांना असे जोडीदार मिळाला तर ते लोक त्यांच्या सोबत वचनबद्ध राहतात.
या राशीचे लोक निष्ठावान असतात. त्यांना नातेसंबंधात प्रेम आणि बांधिलकीने परिपूर्ण असलेल्या एखाद्या व्यक्तीशी संबंध ठेवण्याची कल्पना त्यांना आवडते. त्यांना लग्न करण्याची कधीच घाई नसते.
टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.
संबंधित बातम्या :
Easy Vastu Tips | हे सोपे उपाय करा, घरातील वास्तू दोष दूर होतील
PHOTO | Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार घरात लावा ‘ही’ 5 झाडे, मिळेल सुख-समृद्धी