हैद्राबाद : हैद्राबादमध्ये समता कुंभ 2023चं आयोजन करण्यात आलं आहे. गेल्या तीन दिवसांपासून हा सोहळा सुरू आहे. 12 फेब्रुवारीपर्यंत हा सोहळा चालणार आहे. या सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशीही हजारो भाविकांनी हैद्राबादेत प्रचंड गर्दी केली. शनिवारी सोहळ्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भगवान साकेत रामचंद्राची पूजा करण्यात आली. यावेळी मुचिंतल आश्रमात देवाच्या 18 मूर्तींची तिरुंमजना सेवा करण्यात आली. तसेच 18 दिव्य मूर्तींचा अभिषेकही करण्यात आला. ज्या लोकांनी एक दिवसआधी गरुड सेवेत भाग घेतला त्यांच्या हस्ते हा अभिषेक सोहळा पार पडला.
हैद्राबादच्या मुचिंतल आश्रमात समता कुंभ सोहळा 2023चं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून भाविक आणि साधू संत हैद्राबादेत दाखल झाले आहेत. तिरुमंजना सेवा ही वैश्विक स्तरावर केली जाते. जे लोक ही सेवा पाहता त्यांच्यासाठी ही सेवा नवी आहे.
मात्र, जे लोक गेल्या अनेक वर्षापासून ही सेवा करतात तेही पहिल्यांदाच ही सेवा करत असल्यासारखं मोठ्या उत्साहात या सेवेत भाग घेतात. एकाच ठिकाणी एवढ्या विविध रुपात श्री रामचंद्राचं असणं हे पहिल्यांदाच घडत आहे. एकाचवेळी 18 रुपात श्री रामचंद्राची तिरुमंजना सेवा करणं हा दुर्लभ योग असल्याचं चिन्ना जियर स्वामी यांनी सांगितलं.
या परिसरात सर्व काही नवं असेल. तिरुमंजना सेवेच्या अंतर्गत पेरुमल (ईश्वर)ला सर्वात आधी दह्याची अंघोळ घालण्यात आली. त्यानंतर दूधासोबत तिरुमंजना करणअयात आली. नंतर तेल आणि मग पाण्याने तिरुमंजना सेवा करण्यात आली. आयुर्वेदात पंचकर्म अशाच पद्धतीने केले जाते. अशा प्रकारच्या स्नानामुळे शरीरात नव्या प्रकारची ऊर्जा प्रवाहीत होते, असं स्वामींनी सांगितलं.
समता कुंभमध्ये तिसऱ्या दिवशी संध्याकाळी भगवान साकेत रामचंद्राची शेषवाहन सेवा केली जाते. भगवान श्रीमन्नारायण ज्या रुपात वैकुंठात वीससनममध्ये विराजमान आहेत, त्याच्याशी हे मिळते जुळते आहे. शेषनागाचा अर्थ आहे साक्षात रामानुज. पाच डोक्यांचा शेष हा या कलियुगात वेदातील अर्थपंचक ज्ञान शिकवण्यासाठी भगवान रामानुजच्या रुपात अवतरला आहे, असंही स्वामी म्हणाले.
त्यामुळे तुम्ही जर शेषवाहनावरून स्वामींचं दर्शन घेणार तर तुम्हाला आत्मा आणि परमात्म्यामधील संबंधाची माहिती मिळेल. या समता कुंभमध्ये 18 गरुड सेवासहीत शेषवाहनावर सुशोभित साकेत रामाचे दर्शन केल्यास कालसर्पदोषासारखे संकट दूर होऊन ऐश्वर्य प्राप्त होते, असंही चिन्ना जियर स्वामी यांनी स्पष्ट केलं.