मुंबई : सनातन परंपरेत भगवान शंकराची (Shankar) पूजा अत्यंत साधी आणि लवकर फळ देणारी मानली जाते. भगवान शिव यांना भोलेनाथ (Bholenath) म्हणतात, ते फक्त जल आणि बेलाची पाने अर्पण केल्याने प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. शिवाची विधीवत साधना केल्याने ते आपल्या भक्तांचे सर्व त्रास दूर करतात आणि त्यांच्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण करतात. असे लोक मानतात. भारतातील (India) क्वचितच असा एकही कोपरा असेल जिथे शिवाची मूर्ती नाही किंवा त्यांची पूजा केली जात नाही . भगवान शिव हे कल्याणकारी देवता मानले जातात , ज्यांच्या उपासनेने जीवनातील सर्व दुःखआणि सर्व सुख प्राप्त होतात . सोमवारचा दिवस भगवान शिवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे . चला जाणून घेऊया भगवान शंकराची पूजा केल्याने कोणते मोठे फायदे होतात.
भगवान शिवाची पुजा कराताना या गोष्टी लक्षात ठेवा
गंगेच्या पाण्याने सर्व इच्छा पूर्ण होतील
जर तुमच्याकडे शिव उपासनेशी संबंधित कोणतेही साहित्य नसेल तर तुम्ही शिवलिंगावर गंगाजल अर्पण करुन त्यांची कृपा मिळवू शकता. सोमवारी शिवाला गंगाजल अर्पण केल्याने जीवनाशी संबंधित सर्व दोष दूर होतात आणि इच्छा पूर्ण होतात. जर तुम्ही कोणत्याही आजाराने ग्रस्त असाल आणि तुम्हाला भगवान शिव यांच्याकडून उत्तम आरोग्याचे आशीर्वाद मिळवायचे असतील तर तुम्ही गंगाजलमध्ये थोडे कच्चे दूध मिसळून भगवान शिवाचा जलाभिषेक करावा. हा उपाय केल्यास तुम्हाला लवकरच आरोग्य लाभ मिळतील.
शिव उपासनेने दूर होईल शनि दोष
जर तुमच्यावर शनि वक्र दृष्टी किंवा साडेसाती चालू असेल किंवा तुमच्या कुंडलीमध्ये काल सर्प योग असेल तर ते दूर करण्यासाठी भगवान शंकराची पूजा वरदानापेक्षा कमी नाही. शनि आणि काल सर्प दोषामुळे येणाऱ्या जीवनाशी संबंधित सर्व अडचणी आणि दुःख दूर करण्यासाठी, सोमवारी विधीवत भगवान शंकराची पूजा केल्याने निश्चितच फायदा होतो.
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)
संबंधीत बातम्या :
Vastu Tips | घरात या ठिकाणी बसून जेवण केल्यास फटका बसणार, दारिद्र्याच्या दिशेनं वाटचाल ठरलेली!
Chanakya Niti : जन्मापूर्वीच तुमच्या नशिबात ‘या’ गोष्टी लिहिलेल्या असतात, जाणून घ्या याबद्दल!