Buddha Purnima 2022: वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध जयंती साजरी केली जाते. आजच्या दिवशीच बुद्ध धर्माचे संस्थापक भगवान बुद्ध यांचा जन्म झाला. त्यामुळे याला बुद्ध पौर्णिमा असं म्हणतात. बुद्धाला विष्णु देवाचा नववा अवतार मानलं जातं. वैशाख पौर्णिमेला विष्णु आणि बुद्ध यांची तसंच चंद्र देवाच्या पुजेचे महत्व आहे. बुद्ध पौर्णिमेचा दिवस बौद्ध धर्माच्या अनुयायींसाठी खास असतो. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी नदीत पवित्र स्नान, दान आणि पुजेचे विशेष महत्व असते.
वैशाख पौर्णिमा म्हणजे बुद्ध पौर्णिमा 16 मे म्हणजे आज साजरी केली जात आहे.
पहाटे सकाळी स्नान करून सूर्यदेवाला अर्ध्य दान करा. तसंत वाहत्या पाण्यात तिळाचा दिवा लावा. पिपंळाच्या झाडाला पाणी अर्पण करा. यादिवशी काही भागात शनि जयंती साजरी केली जाते. तुमच्या ऐपती नुसार दान- दक्षिणा करा.
बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी विष्णु देवाची आणि चंद्राची उपासना केल्याने आर्थिक तंगी दूर होते. आत्मबळ वाढते. तसंच धन लाभाचे योग वाढतात. मान संन्मान वाढतो. आजच्या दिवशी दानचे विशेष महत्व आहे. आजच्या दिवशी दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. आजच्या दिवशी केलेल्या दानाचे फळ दुप्पट मिळते. वैशाख पौर्णिमेचा उपवास केल्याने वाईट पापा पासून मुक्ती मिळते.
( दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.यासंदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.)