Masik Durga Ashtami February 2022 : आज माघ दुर्गाष्टमी, जाणून घ्या तिचे महत्व आणि तिथी

| Updated on: Feb 08, 2022 | 6:00 AM

अष्टमी तिथीला दुर्गेची (Durga Ashtami)पूजा केल्याने दीर्घायुष्य मिळते. असे मानले जाते की प्रत्येक महिन्याच्या अष्टमी तिथीला प्रार्थना केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि आपल्या भक्तांचे प्रत्येक संकटापासून रक्षण करते.

Masik Durga Ashtami February 2022 : आज माघ दुर्गाष्टमी, जाणून घ्या तिचे महत्व आणि  तिथी
Goddess-Durga
Follow us on

मुंबई : अष्टमी तिथीला दुर्गेची (Durga Ashtami)पूजा केल्याने दीर्घायुष्य मिळते. असे मानले जाते की प्रत्येक महिन्याच्या अष्टमी तिथीला प्रार्थना केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि आपल्या भक्तांचे प्रत्येक संकटापासून रक्षण करते. हिंदू (Hindu) कॅलेंडरनुसार, प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला देवी दुर्गा ची पूजा केली जाते. हिंदू धर्मात दुर्गा मातेच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. अष्टमी (Astami) तिथीला दुर्गेची पूजा केल्याने दीर्घायुष्य मिळते. असे मानले जाते की प्रत्येक महिन्याच्या अष्टमी तिथीला प्रार्थना केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि तिच्या भक्तांचे प्रत्येक संकटापासून रक्षण करते. 8 फेब्रुवारी, मंगळवार, सकाळी 06:15 वाजता अष्टमीची तारीख सुरू होते. आणि 9 फेब्रुवारी, बुधवार, सकाळी 08:30 वाजता संपणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात मासिक दुर्गाष्टमीचे महत्त्व, तिथी आणि पूजा पद्धती.

माघ महिन्यातील दुर्गा अष्टमीचे

प्रत्येक महिन्याच्या अष्टमीचे महत्त्व मोठे आहे. पण माघ महिन्यातील दुर्गा अष्टमीला विशेष महत्त्व आहे. गुप्त नवरात्रीमुळे माघ महिन्यातील दुर्गा अष्टमीचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या दिवशी साधना करणाऱ्या साधकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. माँ दुर्गा आपल्या भक्तांचे सर्व संकट दूर करते. हे व्रत पूर्ण समर्पणाने पाळल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात असा विश्वास आहे. या दिवशी देवीच्या अनेक मंत्रांचा जप केला जातो आणि दुर्गा चालिसाचा पाठ केला जातो.

अष्टमीची तारीख सुरू होते: 8 फेब्रुवारी, मंगळवार, सकाळी 06:15 वाजता
अष्टमी तिथी समाप्त होते: 9 फेब्रुवारी, बुधवार, सकाळी 08:30 वाजता

पूजा करण्याची पद्धत

पूजा करण्याची पद्धत या दिवशी सकाळी उठून गरम स्नान करून पूजेच्या ठिकाणी गंगाजल टाकून पवित्र करावे. घरातील मंदिरात दिवा लावावा. देवी दुर्गेचा गंगाजलाने अभिषेक करा. देवीली अक्षत, सिंदूर आणि लाल फुले अर्पण करा. धूप आणि दिवे लावून दुर्गा चालिसा पाठ करा आणि नंतर आरती करा.

देवी पूजेत या गोष्टी लक्षात ठेवा

? 2 ते 10 वर्षांच्या मुलींना कन्या पूजेत आमंत्रित करा. पूजेपूर्वी घरात स्वच्छता असावी हे लक्षात ठेवा.

? दोन वर्षांच्या मुलीची पूजा केल्याने दुःख आणि गरिबी दूर होते असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे.

? 3 वर्षांच्या मुलीला त्रिमूर्ती मानले जाते. त्रिमूर्तीची पूजा केल्याने घरात धन आणि अन्न येते.

? चार वर्षांची मुलगी कल्याणी मानली जाते.

? पाच वर्षांच्या मुलीला रोहिणी म्हणतात. त्यांची पूजा केल्याने रोग आणि दुःख दूर होतात.

? सहा वर्षांच्या मुलीला कालिका रुप म्हणतात. कालिका रुपातून ज्ञान आणि विजय प्राप्त होतो. सात वर्षांच्या मुलीला चंडिका म्हणतात.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या :

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते जर तुमच्यात हे 5 गुण असतील तर, शत्रू पण तुमची स्तुती करेल

Zodiac signs : ‘या’ 4 राशीच्या लोकांच्या सहवासात राहा आणि आपले भविष्य उज्ज्वल करा!

Chanakya Niti : वैवाहिक जीवनात चुकूनही ‘या’ 4 गोष्टींना कधीही स्थान देऊ नका, नाहीतर होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागणार नाही!