मुंबई : मंगळवारचा दिवस हनुमानजींना समर्पित आहे. या दिवशी भक्त विधिपूर्वक हनुमानजींची पूजा करतात. अनेक लोक मंगळवारी उपवास करतात. या दिवशी पूजा केल्याने भगवान शनि देव देखील प्रसन्न होतात. मंगळ दोषापासून मुक्त होण्यासाठी ज्योतिषशास्त्रात विशेष उपाय सांगितले गेले आहेत. ज्या लोकांच्या कुंडलीत मंगळ प्रभाव आहे, ते नवीन जोखीम घेतात, उत्साहाने काम करतात.
त्याचबरोबर ज्यांच्या कुंडलीत मंगळ ग्रह कमजोर स्थितीत असेल, त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यांची सर्व कामे चुकीची होऊ लागतात. मंगळ दोष दूर करण्यासाठी मंगळवार हा महत्त्वाचा दिवस आहे. मंगळ दोष काढण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत ते जाणून घ्या –
जेव्हा कुंडलीत मंगळ पहिल्या, चौथ्या, सातव्या आणि बाराव्या घरात असेल, तेव्हा मंगळ दोषाची स्थिती निर्माण होते. त्याचा प्रामुख्याने विवाहित जीवनावर परिणाम होतो. जर मंगळावर कोणत्याही शुभ ग्रहाची दृष्टी पडते तर मंगळ दोषाचा प्रभाव कमकुवत होतो.
1. कुंडलीतील मंगळ दोष दूर करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे हनुमान मंदिरावर लाल किंवा केशरी रंगाचा त्रिकोणी ध्वज लावा.
2. ज्योतिषशास्त्रानुसार, तांबा हा मंगळाचा धातू मानला जातो. ज्या लोकांच्या कुंडलीत मंगळाची स्थिती कमकुवत आहे त्यांनी तांब्याच्या ग्लासात पाणी प्यावे.
3. कुंडलीत मंगळ दोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रत्येक मंगळवारी सुंदरकांडचे पठण करावा.
4. ज्योतिषांच्या मते, मंगळवारी हनुमानजींची पूजा करा आणि व्रत ठेवा. व्रताच्या दिवशी मीठ न खाल्ल्याने मंगळ दोष दूर होतो.
5. मंगळवारी भगवान सूर्याला तांब्याच्या भांड्याने अर्घ्य अर्पण करा आणि त्यांच्यासमोर बसून हनुमान चालीसाचे पठण करा. असे मानले जाते की हा उपाय केल्यास मंगळ दोष दूर होतो.
6. कुंडलीतून मंगळ दोष दूर करण्यासाठी, लाल रंगाचे कपडे दान केल्यास या समस्येपासून सुटका मिळू शकते. याशिवाय, मंगळवारी कलावा बांधल्याने कुंडलीत मंगळाची स्थितीही मजबूत होते.
Shani Dev | शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी शनिवारच्या दिवशी या 3 जणांची सेवा कराhttps://t.co/rNlyEzSRCA#ShaniDev #Shanivar #SaturdayAstroTips
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 14, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Vastu tips for money : या वास्तू दोषामुळे घरात राहत नाही पैसा, व्यक्ती होतो कंगाल