चमत्कारिक तुळशीचे पाणी, नोकरी-व्यवसायात प्रगती, आजारातून मुक्त होण्यास होईल मदत

| Updated on: Nov 30, 2021 | 12:49 PM

हिंदू धर्मात तुळशीच्या (Tulsi Plant) वनस्पतीला खूप महत्त्व देण्यात आलं आहे. तुळस हे लक्ष्मीचे (Goddess Lakshami) रुप असल्याची मान्यता आहे. धार्मिक मान्यतेनुसार प्रत्येक घरात तुळशीचे रोप लावले पाहिजे. तुळशीची नित्य पूजा करुन जल अर्पण केल्यास देवी लक्ष्मीची कृपा होते असे म्हणतात. तसेच, कुटुंबात सुख-शांती नांदते आणि सर्व दुःखांचा नाश होतो, असंही म्हणतात.

चमत्कारिक तुळशीचे पाणी, नोकरी-व्यवसायात प्रगती, आजारातून मुक्त होण्यास होईल मदत
tulsi
Follow us on

मुंबई : हिंदू धर्मात तुळशीच्या (Tulsi Plant) वनस्पतीला खूप महत्त्व देण्यात आलं आहे. तुळस हे लक्ष्मीचे (Goddess Lakshami) रुप असल्याची मान्यता आहे. धार्मिक मान्यतेनुसार प्रत्येक घरात तुळशीचे रोप लावले पाहिजे. तुळशीची नित्य पूजा करुन जल अर्पण केल्यास देवी लक्ष्मीची कृपा होते असे म्हणतात. तसेच, कुटुंबात सुख-शांती नांदते आणि सर्व दुःखांचा नाश होतो, असंही म्हणतात.

तुळशीच्या रोपामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते. तुळशीची नित्य पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते. तुळशीप्रमाणे याच्या पाण्याचेही (Tulsi Water) अनेक फायदे आहेत. तुळशीची पाने घालून तयार केलेले पाणी अत्यंत पवित्र मानले जाते.

तुळशीचे पाणी वापरल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख-समृद्धी येते, असे म्हणतात. जाणून घेऊया तुळशीच्या पाण्याशी संबंधित काही खास उपाय –

श्रीकृष्णाला तुळशीच्या पाण्याने स्नान घालावे

भगवान श्रीकृष्णाला तुळशी अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच कृष्णाला तुळशीच्या पाण्याने स्नान घातल्याने तो खूप प्रसन्न होतो आणि भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करतो, असे म्हणतात. तुम्हालाही भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद हवा असेल तर त्यांना तुळशीच्या पाण्याने स्नान घाला.

घरात सर्व भागात तुळशीचे पाणी शिंपडावे

तुळशीची पाने पाण्यात टाकून रात्रभर राहू द्या. यानंतर सकाळ-संध्याकाळ पूजा केल्यानंतर तुळशीचे पाणी घरामध्ये शिंपडावे. घराचा कोणताही कोपरा तुळशीच्या पाण्याने अस्पर्शित राहू नये. असे मानले जाते की असे केल्याने नकारात्मक शक्ती घरातून निघून जातात आणि घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते.

नोकरी-व्यवसायात प्रगतीसाठी

जर खूप मेहनत करुनही नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होत नसेल, तर तुळशीची पाने पाण्यात तीन दिवस भिजवून ठेवा. यानंतर सकाळी आणि संध्याकाळी पूजेनंतर हे पाणी ऑफिसमध्ये शिंपडावे. यामुळे व्यवसायात प्रगती होण्याचा मार्ग मोकळा होतो आणि लवकर नोकरीही मिळते, नोकरीत पदोन्नती मिळते.

दीर्घ आजारातून बरे होण्यासाठी

जर कुटुंबातील एखादी व्यक्ती दीर्घकाळापासून आजारी असेल, तर त्याच्यावर तुळशीचे पाणी शिंपडावे. पूजा केल्यानंतर आठवडाभर हा उपाय सकाळ-संध्याकाळ करावा. असे केल्याने आजार बरा होऊ लागतो.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Vastu Tips | नोकरी प्रगती हवीये, व्यवसायात दुप्पट नफा कमवायचाय, मग हे सोपे उपाय करुन पाहा

PHOTO | Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार घरात लावा ‘ही’ 5 झाडे, मिळेल सुख-समृद्धी