मुंबई : भारताचा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रथम स्थान आहे (Types of Viman In Satyuga). आजच्या काळात तंत्रज्ञानाने जितका विकास केला आहे पुरातन काळात हे तंत्रज्ञान अधिक विकसित होते. वर्तमानात हवेत युद्धाचा परिणाम देण्यासाठी तंत्रज्ञानाच्या बाबतीत अत्यंत शक्तीशाली विमान तयार केले जातात. पण, भारतासाठी हे काही नवीन नाही, येथे पौराणिक काळातही अशा विमानांचा निर्माण करण्यात आला होता ज्याबाबत तुम्ही विचारही करु शकत नाही (Types of Viman In Satyuga Ramayana Kaal Know How They Had Used).
महर्षी भारद्वाज द्वारा रचित ग्रंथ यन्त्र सर्वशमध्ये चार प्रकारच्या मुख्य विमानांचं वर्णन सापडतं. ज्यांचं नाव क्रमशः त्रिपुर, रुक्म, सुंदर आणि शकुन आहेत.
सुंदर विमान रॉकेटच्या आकृतीचा आणि चंद्राच्या रंगाचा होता. तर शकुन हे विमान पक्षाच्या आकाराचा होता. रुक्म विमान धारदार आकृतीचा सोनेरी रंगाचा होता. या चार विमानांच्या प्रकारामद्ये अनेक विशेषता होती. पण, त्रिपुर विमान सर्वाधिक विशेष आणि प्रमुख होता.
त्रिपुर विमान, ज्याला त्रिपुराजीत या नावानेही ओळखलं जातं. पुराणांमध्ये वायूपेक्षा अधिक गतीने चालणारं विमान म्हणून याला ओळखलं जातं. हे विमान आकाशातच नाही तर, जमिनीवर आणि पाण्यातही चालत होतं. त्रिपुर विमानाचं निर्माण करण्यासाठी ज्या पदार्थांचा प्रयोग करण्यात आला होता त्यांचं वजन अत्यंत कमी होतं. तसेच, या पदार्थांना जाळणे, तोडणे किंवा नष्ट करणे अशक्य होतं.
जल, अग्नी आणि वायुही या विमानांना नष्ट करण्यात असमर्थ होते. त्यामुळे या विमानांना पौराणिक काळापासून सर्वात शक्तीशाली आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने विकसित विमानांच्या श्रेणीत ठेवण्यात आलं आहे. या विमानाचे तीन आवरण किंवा चाकं होते. ज्यामुळे याला त्रिपुर हे नाव देण्यात आलं आहे. साोबतच, त्रिपुर विमानात तीन मजले होते ज्यामध्ये मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करु शकत होते.
जेव्हाही रामायण काळातील विमानांचा उल्लेख होतो तेव्हा पुष्पक विमानाची चर्चा होतेच. पुष्पक विमानाचं नाव कोणाला नाही माहित? असं सांगितलं जातं की हे विमान ब्रह्माजी यांनी कुबेराला भेट म्हणून दिलं होतं. पण, रावणाने पुष्पक विमानाला कुबेरपासून हिसकावून घेतलं होतं. वाल्मीकी रामायणानुसार, रावण सीतेचं हरण करुन याच विमानात घेऊन गेला होता आणि अंततः रावणाचा वध करुन भगवान राम, लक्ष्मण आणि सीता हे पुष्पक विमानानेच परत अयोध्येला आले होते.
या विमानाची विशेषता होती की यामध्ये कितीही प्रवासी प्रवास करु शकत होते, पण तरीही एक खुर्ची नेहमी रिकामी राहात होती. पुष्पक विमान प्रवाशांच्या संख्येनुसार आणि वायुच्या घनतेनुसार आपला आकार लहान-मोठा करु शकत होता.
पुष्पक विमान फक्त एक ग्रह नाही तर इतर ग्रहांचाही प्रवास करण्यास सक्षम होता. विमानांमध्ये इंधनाच्या व्यवस्थेसाठी रावणाच्या लंकेतून सूर्यफुलाच्या झाडातून इंधन काढलं जात होते. पुष्पक विमानाचे अनेक भाग सोन्याने बनलेले होते. हे विमान कुठल्याही ऋतुत आरामदायक आणि सुंदर दिसायचा.
जर पौराणिक काळात असे विमान होते ज्यांना नष्ट करणे अशक्य होतं, तर मग आता ते विमान कुठे आहेत, असा प्रश्न उपस्थित होतो. काय ते पृथ्वीवर नसून दुसऱ्या कुठल्या लोकात आहेत? हे तर सध्या कोणालाही माहित नाही.
Hanuman Ji | बजरंगबली कृपा हवी असेल तर मंगळवारच्या दिवशी ‘हे’ उपाय कराhttps://t.co/kDz9BFzAsP#Hanuman
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 6, 2021
Types of Viman In Satyuga Ramayana Kaal Know How They Had Used
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
कृष्णाच्या यशोदा मातेला विष्णूचं खास वरदान, जाणून घ्या पौराणिक कथा