मुंबई : हिंदू पंचांगातील पहिला महिना चैत्र सुरु झाला आहे. या महिन्याला चित्रा नक्षत्रामुळे हे नाव देण्यात आलं आहे. या महिन्यात वसंत आणि उन्हाळ्याला सुरुवात होते. यावेळी 29 मार्च ते 27 एप्रिल पर्यंत चैत्र महिना असणार आहे (Upcoming April Month Festivals And Vrat List).
हिंदू धर्मानुसार हा महिना पवित्र आणि शुभ मानला जातो. या महिन्याच्या पंचमी तिथीला रंगपंचमीचा (Rang Panchami) सण साजरा केला जातो. 13 एप्रिलपासून नवरात्र (Navratri) सुरु होणार आहेत. तर 21 एप्रिलपासून राम नवमी साजरी केली जाईल. या महिन्याच्या पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व आहे. या खास दिवशी दान-पुण्य केल्याने लाभ मिळतो.
2 एप्रिल – गुड फ्रायडे
4 एप्रिल – शीतला अष्टमी
7 एप्रिल – पापमोचिनी एकादशी
9 एप्रिल – प्रदोष व्रत
10 एप्रिल – मासिक शिवरात्री
13 एप्रिल – नवारात्र
14 एप्रिल – वैसाखी
16 एप्रिल – विनायक चतुर्थी
21 एप्रिल – राम नवमी
22 एप्रिल – चैत्र नवरात्र पारण
23 एप्रिल – कामदा एकदाशी
24 एप्रिल – शनी प्रदोष
26 एप्रिल – चैत्र पौर्णिमा
या महिन्यात सूर्य देवाची पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होतं. जर तुम्हाला यश आणि पद, प्रतिष्ठा हवी असेल तर भगवान सूर्याची पूजा-अर्चना करा. चैत्र महिन्यात लाल फळांचं दान करणे चांगलं असते. घरातील झाडांना नियमित पाणी घाला
चैत्र महिन्यात जेवण कमी करावं. पाणी खूप प्या. त्याशिवाय रसाळ फळांचं सेवन करा. या महिन्यात शिळ अन्न खाऊ नये. त्याशिवाय चैत्र महिन्यात गुळाचं सेवन करु नका.
Rang Panchami 2021 | होळी झाली, आता करा रंगपंचमीची तयारी…https://t.co/Wjm2vCK0F0#RangPanchami2021 #Holi2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 30, 2021
Upcoming April Month Festivals And Vrat List
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Lord Hanuman | मंगळवारी ‘ही’ कामं टाळा, नाहीतर हनुमंत होतील नाराज
गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या पौराणिक कथा आणि महत्त्व…
भारतातील ‘या’ मंदिरांमध्ये पुरुषांना “नो एन्ट्री”, जाणून घ्या यामागील कारण…