मुंबई : 17 एप्रिलपासून (17 April) वैशाख महिना सुरू झाला आहे. हिंदू कॅलेंडरच्या या महिन्यात सणांची लयलूट आपल्याला पाहायला मिळते. या महिन्यात भगवान विष्णू,(Vishnu) परशुराम आणि देवीची पूजा केली जाते. या महिन्यात गंगा किंवा सरोवरात स्नान करण्याचे खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की यावेळी शुभ कार्याची सुरुवात होते. वैशाख महिना 16 मे (16 May) पर्यंत सुरु राहणार आहे. वैशाख महिना साधारणपणे एप्रिल ते मे या काळात सुरू होतो. विशाखा नक्षत्राशी संबंधित असल्यामुळे याला वैशाख म्हणतात. वैशाख महिन्यात सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून पाणी दान करण्याचे महत्त्व पुराणात सांगितले आहे. या महिन्यात पितरांना तर्पण अर्पण करण्यासोबतच फळ दान करण्याचेही विशेष महत्त्व आहे. हा महिना भगवान विष्णूंचा प्रिय महिना मानला जातो.
वैशाख महिना १६ मे पर्यंत चालणार
वैशाख महिना साधारणपणे एप्रिल ते मे या काळात सुरू होतो. विशाखा नक्षत्राशी संबंधित असल्यामुळे याला वैशाख म्हणतात. या महिन्यात पैसे मिळण्याची शक्यता आहे. यावेळी 17 एप्रिल ते 16 मे पर्यंत वैशाख महिना चालणार आहे.
– 17 एप्रिल, रविवार, वैशाख महिन्याची सुरुवात, इस्टर
– 19 एप्रिल, मंगळवार, संकष्टी चतुर्थी व्रत
– 23 एप्रिल, शनिवार, कालाष्टमी व्रत –
– 26 एप्रिल, मंगळवार, वरुथिनी एकादशी व्रत
– 28 एप्रिल, गुरुवार, गुरु प्रदोष व्रत
– 29 एप्रिल , शुक्रवार, वैशाख मासिक शिवरात्री
– 30 एप्रिल, शनिवार, वैशाख अमावस्या, दक्षिण भारतात शनी जयंती जाईल.
– 01 मे, रविवार, सूर्यग्रहण
– 03 मे, मंगळवार, अक्षय्य तृतीया, परशुराम जयंती
– 08 मे, रविवार, गंगा सप्तमी
– 10 मे, मंगळवार, सीता नवमी
– 12 मे, गुरुवार, मोहिनी एकादशी
– 13 मे, शुक्रवार, प्रदोष उपवास
– 14 मे, शनिवार, नरसिंह जयंती
– 15 मे, रविवार, वैशाख पौर्णिमा, वृषभ संक्रांती
संबंधीत बातम्या
Sunday Remedies: रविवारी करा ‘हे’ उपाय; जाणवणार नाही पैशांची कमतरता
Jyotish tips: सुख म्हणजे नक्की काय असतं?, चार गोष्टी टाळल्या की ते घर बसल्या मिळतं!
केशरशी संबंधित हे उपाय करा, समस्या तर दूर होतीलच पण आयुष्य ‘धन’ धनाधन धन होईल!