वास्तु शास्त्रात घरातील अनेक गोष्टी कोणत्या दिशेला असाव्या, कोणत्या गोष्टी घरात असू नये याबाबत सांगण्यात आले आहे. वास्तूशास्त्र अनेक दोष दूर करण्यात मदत करतात. आज आम्ही तुम्हाला घराच्या उत्तर दिशेला कोणते झाड लावावे आणि त्याच्या वास्तूशास्त्रानुसार काय फायदा होतो हे सांगणार आहोत. कोणत्या शुभ गोष्टी असतात ज्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते. उत्तर दिशेला धन देवता कुबेर आणि लक्ष्मी निवास करतात. तर चला मग जाणून घेऊया.
तुळस
तुळस हिंदू धर्मात पूजनीय मानली जाते. कारण तुळस हे लक्ष्मी मातेचं रुप आहे. घराच्या उत्तर दिशेला तुळस लावल्याने आर्थिक बाजु भक्कम होते. तुळसची दररोज पूजा केली तर लक्ष्मी माता प्रसन्न होते. दररोज अंघोळ करुनच तुळशीची पूजा करावी.
केळीचे झाड
केळीचे झाड हे भगवान विष्णुचे रुप मानले जाते. घरात केळीचे झाड असणे शुभ मानले जाते. दररोज या झाडाची पूजा केल्यास विष्णू आणि लक्ष्मी प्रसन्न होते. त्यामुळे उत्तर दिशेला हे झाड लावणे शुभ मानले जाते. रविवारी या झाडाजवळ दिवा लावल्यास घरात सुख आणि समृद्धी नांदते.
मनी प्लांट
मनी प्लांट देखील गुडलक म्हणून घरात लावले जाते. उत्तर दिशेला हे झाड असल्यास ते शुभ मानले जाते. पण या झाडाची फांदी खाली लटकलेल्या स्थितीत असू नये.
बांबू
वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेला बांबूचे झाड लावणे शुभ मानले जाते. यामुळे घरात सुख-शांती राहते. या झाडाला गुडलक म्हणून देखील घरात ठेवतात. याशिवाय नकारात्मक गोष्टी देखील घरातून हे झाडं नाहीसं करतं.