मुंबई : घरातील पूजेचं स्थळ एक असं स्थान आहे जिथे जाऊन नतमस्तक झाल्याने कोणत्याही चिंता किंवा समस्येच्या तणावातून मुक्तता मिळते. मनाची शांती आणि ऊर्जा प्रदान करणाऱ्या या पवित्र स्थानाबद्दल काही नियम सांगितले गेले आहेत. त्यानुसार, आपली साधना लवकरच यशस्वी होते आणि दैवी आशीर्वाद प्राप्त होतात. घरी देवतांच्या पूजेच्या स्थळासाठी वास्तुचे कोणते नियम पाळले पाहिजेत ते जाणून घ्या (Vastu Shastra Tips For Temple At Home 10 Rules) –
❇️ घरात मंदिर नेहमीच ईशान्य दिशेने बनवले पाहिजे. कारण ईशान्य कोन हा शुभ प्रभावांनी परिपूर्ण असतो. घराच्या या भागात सत्व उर्जेचा प्रभाव 100 टक्के असतो.
❇️ घराच्या आत ठेवलेल्या मंदिराच्या आकाराबद्दल बोलत असताना त्याची उंची ही रुंदीच्या दुप्पट असावी.
❇️ घरामध्ये मंदिर बांधताना खाली किंवा वर किंवा त्याच्या शेजारी शौचालय असू नये हे नेहमी लक्षात ठेवा.
❇️ पूजाघर कधीही घराच्या पायर्याखाली बांधू नये.
❇️ मृत व्यक्तींचा फोटो कधीही पूजाघरात ठेवू नये.
❇️ खंडित मूर्ती किंवा फाटलेले चित्र विसरुनही पूजाघरात ठेवू नये. अशी मूर्ती किंवा फोटो खड्डा खणून एखाद्या पवित्र ठिकाणी पुरले पाहिजे.
❇️ मंदिरात धन-संपत्ती लपवून ठेवणे शुभ मानले जात नाही.
❇️ घराच्या बेडरुममध्ये पूजाघर कधीही बांधू नये. जर ते बनवने तुमची मजबुरी असेल तर त्या खोलीच्या ईशान्य कोपऱ्यात बनवा आणि रात्री झोपताना नक्कीच त्यावर एक पडदा घाला.
❇️ देवाची पूजा नेहमी पवित्र स्थानी आणि नेहमीच शांत मनाने करावी.
❇️ देवाच्या मूर्तीच्या समोर उभे राहून कधीही पूजा-आरती करु नये.
तुळस किंवा रुद्राक्ष माळ घालण्यापूर्वी हे नियम जाणून घ्याhttps://t.co/Resmljl6So#Tulsi #rudraksha #mala #spiritual
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 14, 2021
Vastu Shastra Tips For Temple At Home 10 Rules
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :