मुंबई : पुरुष आणि स्त्रिया अशा अनेक गोष्टी त्यांच्या पर्समध्ये किंवा पाकिटात ठेवतात ज्याची गरज नसते. वास्तुनुसार काही गोष्टी पर्समध्ये ठेवणे अशुभ मानले जाते. यामुळे, व्यक्तीकडे पैसे नाहीत. इच्छा असतानाही जर तुम्ही पैसे वाचवू शकत नसाल, नेहमीच पैशांची कमतरता असते. तर, वास्तूनुसार कोणत्या गोष्टी पर्समध्ये ठेवू नयेत हे जाणून घेऊया –
बरेच लोक पर्समध्ये पैशांव्यतिरिक्त इतर गोष्टीही ठेवतात, ज्यामुळे देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते. काही लोक पैशांच्या व्यवहाराचे बिल त्यांच्या पर्समध्ये ठेवतात. जर तुम्ही पर्समध्ये बराच काळ बिल ठेवले तर वास्तुदोष लागू शकतो. असे केल्याने पैशांचे नुकसान होते.
वास्तूनुसार पर्समध्ये देवाचा फोटो किंवा कागद ठेवू नये. असे केल्याने कर्ज वाढते. याशिवाय, कुटुंबातील मृत व्यक्तीचे चित्रही कधी पर्समध्ये ठेवू नये.
अनेक लोक त्यांच्या नातेवाईकांचे फोटो त्यांच्या पर्समध्ये ठेवतात, पण वास्तुशास्त्रात ते चुकीचे मानले गेले आहे. वास्तुनुसार पर्सला देवी लक्ष्मीचे निवासस्थान मानले जाते. त्यामुळे असे चित्र ठेवल्याने वास्तूदोष लागतो.
पर्समध्ये कोणत्याही प्रकारची चावी ठेवल्यानेही वास्तूदोष लागतो. असे केल्याने व्यवसायात आणि पैशांत घट होते. फाटलेल्या नोटा पर्समध्ये ठेवू नयेत.
या गोष्टी लक्षात ठेवा
वास्तूनुसार पर्समध्ये एक चिमूटभर तांदूळ ठेवल्याने पैशांची बचत होते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वादही मिळतो.
पैसे कशाही प्रकारे ठेवू नयेत, असे करणे अशुभ आहे. पैसा नेहमी व्यवस्थित ठेवला पाहिजे. आधी मोठ्या नोटा आणि नंतर छोट्या नोटा. याशिवाय नाणी आणि नोटा सोबत ठेवू नयेत. असे मानले जाते की नाण्यांच्या आवाजामुळे देवी लक्ष्मी एकाच ठिकाणी राहत नाही, म्हणून नोटा आणि नाणे वेगळे ठेवावेत.
Debt removal vastu remedies : कर्ज कमी होत नाहीये, वास्तू दोष याचं कारण असू शकते, हे महाउपाय कराhttps://t.co/U3VgHgNZL4#VastuTips #VastuDosh #Vastushatra
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 5, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Vastu Tips | स्वयंपाक घरात या 4 गोष्टी नेहमी ठेवाव्यात, अन्यथा देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते