Vastu Tips | घरात ठेवलेल्या या वस्तूंमुळे आर्थिक समस्या वाढू शकतात, तात्काळ घराबाहेर फेका…

| Updated on: Jun 28, 2021 | 10:30 AM

जर कोणत्याही ग्रहाची दशा-दिशा योग्य नसेल तर तुमच्या आयुष्यात बऱ्याच समस्या उद्भवू शकतात. आपली काम रखडू शकतात. जर आपल्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असेल किंवा पैसे मिळविण्याचे नवीन मार्ग शोधत असाल तर आपल्याला अडचणींचा सामना करावा लागतो (Vastu Tips Do Not Put These Things In Your House Will Cause Financial Problems).

Vastu Tips | घरात ठेवलेल्या या वस्तूंमुळे आर्थिक समस्या वाढू शकतात, तात्काळ घराबाहेर फेका...
या सोप्या उपायांचे पालन केल्याने लवकरच पूर्ण होते आनंद आणि समृद्धीचे स्वप्न
Follow us on

मुंबई : आपल्या जीवनात ग्रहांचं विशेष महत्त्व आहे. त्यांच्या चांगल्या-वाईट स्थितीचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत, जर कोणत्याही ग्रहाची दशा-दिशा योग्य नसेल तर तुमच्या आयुष्यात बऱ्याच समस्या उद्भवू शकतात. आपली काम रखडू शकतात. जर आपल्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असेल किंवा पैसे मिळविण्याचे नवीन मार्ग शोधत असाल तर आपल्याला अडचणींचा सामना करावा लागतो (Vastu Tips Do Not Put These Things In Your House Will Cause Financial Problems).

वास्तुशास्त्रानुसार, वास्तु दोषांमुळे बर्‍याच वेळा तुम्हाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आर्थिक संकटाचे मुख्य कारण आहेत, जे जाणून घ्या आणि या गोष्टी आज घराबाहेर करा –

झाडू

झाडू नेहमीच लोकांच्या नजरेपासून दूर ठेवला पाहिजे. झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. म्हणून, झाडू नेहमी सोफा किंवा बेडच्या खाली ठेवा. याशिवाय झाडू कधीही उभा ठेवू नये. वास्तुनुसार नेहमीच आतून बाहेरपर्यंत झाडू लावा. कधीही बाहेरुन आत झाडू लावू नये, यामुळे घरात दारिद्र्य येते.

घरात खराब झालेलं सामान ठेवू नका

वास्तुनुसार, खराब घड्याळ, तुटलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, तुटलेली मातीची भांडी, तुटलेले फर्निचर इत्यादी वस्तू घरात ठेवू नका. या गोष्टी ग्रहांची वाईट स्थिती दर्शवितात. या गोष्टी ताबडतोब घराबाहेर फेकून द्या.

कबूतराचे घरटे

वास्तुनुसार, घरात कबूतराचे येणे, अंडी घालणे किंवा फुटणे, या सर्वामुळे होणारी घाण ही तुमच्या आर्थिक संकटात अडथळा आहे. ते बुध ग्रह दर्शवितात. काही लोक पक्ष्यांच्या घराच्या छतावर बाजरी इत्यादी ठेवतात. आपण पक्ष्यांना घराच्या आत न देता बाहेर दिले पाहिजे. आर्थिक अडचणींसाठी कबूतरांचे घरी येणे चांगले नाही.

काटेरी झाडे लावू नका

वास्तुनुसार, काटेरी किंवा दूध देणारी झाडे घरात लावू नये. ही झाडे वाईट वास्तुचे राहू आणि शनि यांचे प्रतिनिधित्व करतात. ही झाडे तुळशी किंवा इतर झाडांसह लावू नका. यामुळे आर्थिक अडचणी येऊ शकतात.

घरात ओलसरपणा

वास्तुच्या मते, घरात ओलसरपणा म्हणजे शनि आणि राहूचं खराब कॉम्बिनेशन चंद्रावर भारी पडते. मान्यता आहे की जेव्हा घरात ओलसरपणा येतो तेव्हा पैशांत घट देखील होते. याव्यतिरिक्त, त्वचेच्या संसर्गाचा धोका देखील वाढतो.

घराच्या पायर्‍याखाली स्वयंपाकघर बनवू नका

वास्तुनुसार स्वयंपाकघर हे घराचा एक महत्त्वाचा भाग आहे. घर बांधताना कधीही पायऱ्यांखाली स्वयंपाकघर किंवा शौचालय बनवू नका. याशिवाय, पायर्‍यांखाली शूज आणि चप्पल ठेवू नका. वास्तुनुसार, पायऱ्यांमुळे आयुष्यात उंची वाढते. म्हणून या गोष्टी टाळाव्या.

Vastu Tips Do Not Put These Things In Your House Will Cause Financial Problems

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Vastu Tips : चिमूटभर मीठ दूर करेल तुमच्या सर्व समस्या, घरात सुख-समृद्धी येईल

Vastu Tips | लग्नात अडथळे येत असतील तर हे उपाय करा, दूर होईल वास्तुदोष