‘देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी’, हे गाणं आपण सर्वांनी ऐकलं आहे. या गाण्याचे अर्थ खूप सोपे, समजणारे आणि खरेदेखील आहेत. देव अनंतात, चराचरात आहेत. देवावर फक्त श्रद्धा असली पाहिजे. देवाचा वास सर्वत्र आहे, प्रत्येक दिशाला आहे. असं असलं तरी हिंदू घरांमध्ये देवाच्या पूजेला एक वेगळं महत्त्व आहे. शास्त्रांनुसार, घराच्या देवाच्या पूजेसाठी विशेष स्थान आहेत. घरात ज्या ठिकाणी पूजेचं स्थान असतं ती जागा खूप पवित्र मानली जाते. त्यामुळे पूजेच्या ठिकाणची जागा नेहमी स्वच्छ राहावी, असा प्रयत्न सर्वजण करतात. तसेच पूजेच्या ठिकाणी किंवा देव्हाऱ्याच्या ठिकाणी शांतात राहिली पाहिदे. शास्त्रांनुसार, ज्या घरात स्वच्छता आणि शांतमय वातावरण आहे तिथे सकारात्मक शक्तीचा वास असतो.
पूजेच्या ठिकाणी थोडी जरी अव्यवस्था असली तर त्याचा नकारात्मक परिणाम त्या घरात वास्तव्यास असणाऱ्या कुटुंबावर पडतो, असं म्हटलं जातं. त्यामुळे अशुभ वाटतील अशी कोणतीच वस्तू तिथे ठेवू नये. वास्तू शास्त्रानुसार, घरात पूजेचं स्थान नेहमी ईशान्य दिशेला म्हणजेच उत्तर-पूर्व दिशेला असलं पाहिजे. या दिशेत देव्हारा असल्यास किंवा पूजेचं ठिकाण असल्यास घरातील सदस्यांवर सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडतो. तसेच ही ऊर्जा कायम घरातील सदस्यांसोबत राहते. तुम्हाला घरात कोणताही कलह नको असेल, शांतमय, सुखी आणि आरोग्यदायी आयुष्य हवं असेल तर पुढील 7 गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)