Vastu Tips for plant: चुकूनही भेट म्हणून देऊ नका मनी प्लांट; धनहानी सोबतच ‘या’ संकटांचाही करावा लागेल सामना!

| Updated on: Jun 16, 2022 | 11:20 AM

वास्तुशास्त्रात केवळ दिशाच नव्हे तर झाडे-वनस्पतींचे महत्त्वही विस्ताराने सांगितले आहे (Vastu Tips for plant). म्हणूनच लोक त्यांच्या घरात अनेक प्रकारची झाडे लावतात. हिरवीगार झाडे केवळ दिसायलाच चांगली नाहीत तर ते घरात सकारात्मक ऊर्जासुद्धा  निर्माण करतात. वास्तूमध्ये अशा अनेक वनस्पतींचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्यांची लागवड घरात सुख-समृद्धी आणते.  यापैकीच एक झाड किंवा वेल म्हणजे मनी […]

Vastu Tips for plant: चुकूनही भेट म्हणून देऊ नका मनी प्लांट; धनहानी सोबतच या संकटांचाही करावा लागेल सामना!
Follow us on

वास्तुशास्त्रात केवळ दिशाच नव्हे तर झाडे-वनस्पतींचे महत्त्वही विस्ताराने सांगितले आहे (Vastu Tips for plant). म्हणूनच लोक त्यांच्या घरात अनेक प्रकारची झाडे लावतात. हिरवीगार झाडे केवळ दिसायलाच चांगली नाहीत तर ते घरात सकारात्मक ऊर्जासुद्धा  निर्माण करतात. वास्तूमध्ये अशा अनेक वनस्पतींचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्यांची लागवड घरात सुख-समृद्धी आणते.  यापैकीच एक झाड किंवा वेल म्हणजे मनी प्लांट (money plant). हे रोप घरात लावल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही. वास्तूनुसार घरामध्ये मनी प्लांट ठेवल्याने देवी लक्ष्मीची कृपा राहते आणि समृद्धी येते. परंतु याबद्दलचे एक तथ्य कदाचित तुम्हाला माहिती नसेल घरात बसवलेला मनी प्लांट चुकूनही भेट म्हणून देऊ नये, अन्यथा धनहानीचा सामना करावा लागू शकतो. जाणून घेऊया यामागचे कारण

 

मनी प्लांट भेट म्हणून का देऊ नये

आजकाल झाडं भेटवस्तू देण्याचा ट्रेंड आहे. बहुतेक जण शुभ प्रसंगी  एखादे सुंदर झाड भेट म्हणून देतात. एक तर ते दिसायला आकर्षक असते शिवाय पर्यावरणासंबंधित शुभ संदेशही या निमित्त्याने जातो, पण याबद्दल काही काळजी घेणे आवश्यक आहे.  वास्तुशास्त्रानुसार घरातील मनी प्लांट कधीही इतरांना देऊ नये. असे मानले जाते की, घरात ठेवलेला मनी प्लांट हा शुक्र ग्रहाचा कारक असतो. मनी प्लांटमुळे शुक्राची सकारात्मक ऊर्जा घरात राहते.

हे सुद्धा वाचा

याशिवाय, जेव्हा तुम्ही हे झाड दुसऱ्याला भेट देता तेव्हा त्या रोपासोबतच तुमच्या घरातील सुख-समृद्धीही दुसऱ्याच्या घरात जाते. इतकेच नाही तर वास्तूनुसार मनी प्लांट व्यतिरिक्त त्याची पाने कोणालाही देऊ नयेत. असे केल्याने धनाची हानी होते.

मनी प्लांट लावताना या गोष्टी लक्षात ठेवा

मनी प्लांट कधीही जमिनीवर लावू नये. असे मानले जाते की जमिनीवर मनी प्लांट लावल्याने घरात नकारात्मकता येते. मनी प्लांटच्या वेली जमिनीला टेकू देऊ नये. असे झाल्यास लक्ष्मी नाराज होते. मनी प्लांट नेहमी घरच्या आताच लावावे ते अंगणात किंवा बाल्कनीत लावू नये. सुकलेले मनी प्लांट अशुभ मानले जाते. त्याचा तुमच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम होतो. हे टाळण्यासाठी मनी प्लांटला नियमित पाणी देत ​​राहा आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला त्याची पाने कोरडी दिसली तेव्हा तुम्ही ती वाळलेली पाने काढून टाका. संपूर्ण मनी प्लांट वळले असल्यास ते घरायतून काढून टाकणेच योग्य आहे. वाळलेल्या मनी प्लांटमुळे पैशाचे नुकसान होते.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)