यशस्वी व्यवसायाच्या मागे कठोर परिश्रम, समर्पण आणि इतर अनेक गोष्टी असतात. त्यांचे पालन केल्याने व्यवसायात यश मिळू शकते. वास्तूशास्त्रानुसार ऑफिसची व्यवस्था केल्यास त्याचा माणसांना खूप मोठा फायदा होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या वस्तू ऑफिसमध्ये ठेवल्यावर अधीक फायदा होईल.
बांबूचे रोप - घरासाठी चांगले मानले जाण्यासोबतच ते ऑफिससाठीही तितकेच फायदेशीर मानले जाते. वास्तूनुसार ऑफिसच्या टेबलावर बांबूचा रोप ठेवल्याने व्यवसायात प्रगतीची शक्यता वाढते.
कासव - वास्तूनुसार कार्यालयात धातूपासून बनवलेले कासव ठेवावे कारण ते खूप शुभ असते असे मानले जाते. असे केल्याने धनलाभ आणि व्यवसायात यश मिळते. यामुळे तुमची रखडलेली कामे लवकर मार्गी लागतात.
लाफिंग बुद्धा - घरासाठी खूप शुभ मानले जात असले तरी ऑफिसमध्ये लाफिंग बुद्ध असणे खूप शुभ मानले जाते. यामुळे वातावरण सकारात्मक राहते.
क्रिस्टल ट्री - असे मानले जाते की क्रिस्टल ट्री व्यवसायाला गती देण्यास मदत करते. कार्यालयात स्फटिकाचे झाड ठेवल्याने व्यावसायिकाचे रखडलेले काम पुन्हा सुरू होते, असे सांगितले जाते.