मुंबई : नाते घट्ट बनवण्यात प्रेम (Love) आणि परस्पर समन्वय महत्त्वाची भूमिका बजावतात. नात्यात समंजसपणा असेल तर अनेक अडचणींना (Difficulties) सहज तोंड देता येते. मात्र, कधीकधी परस्पर समन्वय असूनही, नातेसंबंधात समस्या निर्माण होतात. विशेष म्हणजे नात्यामध्ये समस्या का वाढत आहेत? हे व्यक्तीला समजण्यासाठी खूप उशीर होतो. नात्यामध्ये वाढलेल्या तणावाचे (Stress) कारण अनेक वेळा वास्तुदोषही असू शकतात. वास्तुशास्त्रातील नियमांकडे दुर्लक्ष केल्यास आर्थिक आणि शारीरिक समस्या निर्माण होतात. वास्तूच्या माध्यमातून नाते आणखी घट्ट करता येते. वास्तुनुसार बेडरूममध्ये कोणत्या वस्तू ठेवाव्यात हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
लव्ह बर्ड
नावाप्रमाणेच हे प्रेमाचे लक्षण आहे. तुमच्या खोलीत लव्ह बर्ड असेल किंवा ठेवायचा असेल तर त्यासाठी नेहमी दक्षिण-पश्चिम दिशा निवडा. तुम्हाला हवे असल्यास लव्ह बर्डच्या मूर्तीऐवजी तुम्ही त्याचा फोटोही खोलीत लावू शकता. असे केल्याने नात्यात गोडवा येतो आणि प्रेमाचे वातावरण राहते असे म्हणतात.
हिमाचलचा फोटो
घरात हिमालयाचा फोटो लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते असे म्हणतात. बेडरूममध्ये हिमाचलचा फोटो लावल्याने मन शांत होते आणि आनंदी वातावरण राहते. ते तुमच्या खोलीत योग्य ठिकाणी लावा.
राधा-कृष्णाचा फोटो
प्रेमाचे प्रतीक मानले जाणारे राधा-कृष्णाचा फोटो बेडरूममध्ये लावणे चांगले मानले जाते. वास्तूनुसार बेडरूममध्ये राधा-कृष्णाचे चित्र किंवा मूर्ती नैऋत्य दिशेला लावावी. असे केल्याने पती-पत्नीमधील प्रेमही वाढते.
बांबू वनस्पती
वास्तुशास्त्रानुसार बांबूला सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. जे घरात लावल्यास कुटुंबात सुख-समृद्धी येते. नात्यात सर्वकाही चांगले राहण्यासाठी बेडरूमच्या पूर्व-दक्षिण दिशेला लावावे. असे मानले जाते की बांबूची वाढ ज्या वेगाने होते, त्याच वेगाने व्यक्तीची प्रगती होते.
संबंधित बातम्या :
20 February 2022 Panchang | 20 फेब्रुवारी 2022, जाणून घ्या रविवारचे पंचांग शुभ मुहूर्त आणि राहुकाळ
ketu gochar 2022 | सावधान ! या 6 राशीच्या लोकांच्या आयुष्यात केतू निर्माण करेल अशांतता