मोराची पिस -भगवान श्री कृष्णाचे आवडते मोराची पिस घरामध्ये ठेवणं अतिशय शुभ मानले जाते. मोराची पिस घरात ठेवल्याने. धन आणि बुद्धिमत्ता प्राप्त होते अशी मान्यता आहे.यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच घरात सुख-शांती कायम राहते. परंतु एकाच वेळी अनेक मोराची पिसे घरात ठेवू नयेत, फक्त 1 ते 2 मोराची पिसे घरामध्ये ठेवावीत.
चक्र - गोमती चक्र समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य, संपत्ती, मन:शांती देते आणि वाईट प्रभावांपासून संरक्षण करते असे मानले जाते. जर तुम्ही 11 गोमती चक्रे पिवळ्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवली तर घरातील धन वाढण्यास मदत होते.
धातूचे कासव - चांदी, पितळ किंवा कांस्य धातूंपासून बनवलेले कासव घरात ठेवणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की उत्तर दिशेला ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर राहते. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते.
तुळशी आणि मनी प्लांट - नवीन वर्षाच्या दिवशी घरात तुळशी आणि मनी प्लांट लावणे खूप शुभ मानले जाते. तुळशीचे रोप घरात ठेवल्याने सुख, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते. तर मनी प्लांटच्या वृक्षामुळ संपत्तीचा वर्षाव अशी मान्यता आहे.