मुंबई, महात्मा विदुर हे महाभारत (Mahatma Vidur Mahabharat) काळातील सर्वात बौद्धिक मानले जातात. त्यांच्याबद्दल असे म्हटले जाते की, ते लोकांना वेळेपूर्वी येणाऱ्या परिस्थितीची माहिती देत असत. विदुरांच्या शब्दाचे पालन केले तर आयुष्यात कधीच अडचणी येत नाहीत. विदुर सांगतात की, स्वतःची आणि दुसऱ्याची ओळख असणं खूप गरजेचं आहे, कारण गरज असताना किंवा अडचणीच्या प्रसंगी आपल्यासोबत कोण उभे असणार याची शाश्वती असणे आवश्यक आहे.
महात्मा विदुर म्हणतात की, संकटाच्या वेळी स्वत:ची आणि दुसऱ्याची ओळख होते. संकटसमयी एखादी व्यक्ती तुमच्या सोबत राहिली तर ती तुमची आहे. त्यांच्या मते, एखादी व्यक्ती त्याच्या चांगल्या काळात ओळखली जात नाही. माणसाची खरी ओळख तेव्हा होते जेव्हा तो संकटांनी घेरलेला असतो.
विदुर नीतीनुसार, एखाद्या व्यक्तीची ओळख तेव्हाच होते जेव्हा तो संकटांनी घेरलेला असतो. त्याच्या गुणांचे आकलन अशा वेळीच करता येते. संकटकाळी मदतीसाठी तत्पर असणारी व्यक्ती खरी शुभचिंतक असते.
त्यांच्या मते स्वार्थी लोकं चांगल्या काळात तुमची खुशामत करून आपला स्वार्थ पूर्ण करतात, पण जेव्हा संकटाची वेळ येते तेव्हा असे लोकं सर्वात आधी पळून जातात. महात्मा विदुर म्हणतात की, संकटाच्या वेळी माणसाने संयम सोडू नये. परिस्थिती कशीही असली तरी संयम राखला पाहिजे.
महात्मा विदुर हे ऋषी वेदव्यास यांचे पुत्र होते. विदुर हे पांडवांचा सल्लागार होते आणि त्यांनी अनेक प्रसंगी दुर्योधनाने रचलेल्या कटातून पांडवांचे रक्षण केले. कौरवांच्या दरबारात द्रौपदीच्या अपमानालाही विदुराने विरोध केला होता.
हस्तिनापूरचा राजा शंतनू आणि राणी सत्यवती यांना चित्रांगद आणि विचित्रवीर्य असे दोन पुत्र होते. चित्रांगद आणि विचित्रवीर्य यांच्या बालपणीच मृत्यू झाला, त्यामुळे त्यांचे पालनपोषण भीष्मांनी केले. मग भीष्माने चित्रांगद मोठा झाल्यावर त्याला सिंहासनावर बसवले, पण काही काळानंतर चित्रांगद गंधर्वांशी लढताना मारला गेला. त्यानंतर त्याचा भाऊ विचित्रवीर्य राज्य झाला.
भीष्माने विचित्रवीर्य यांचा विवाह काशीराजांच्या अंबिका आणि अंबालिका या दोन मुलींशी करून दिला. पण लग्नानंतर त्यांचाही मृत्यू झाला. दोन्ही भावांच्या मृत्यूनंतर, राणी सत्यवतीने भीष्मांना अंबिका आणि अंबालिका यांच्याशी विवाह करण्यास सांगितले जेणेकरून त्यांचा वंश चालू राहील. पण भीष्मांनी लग्नास नकार दिला.