मुंबई : आज श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थी आहे. या दिवशी गणपतीची पूजा केली जाते. विनायक चतुर्थीचा सण प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला पाळला जातो. हिंदू धर्मात भगवान गणेश हे प्रथम पूज्य दैवत आहेत. मान्यता आहे की, कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणेशाचे पूजन केल्यास सर्व अडथळे दूर होतात. गणेशजींची पूजा केल्याने घरात सुख आणि समृद्धी येते.
विनायक चतुर्थीला गणपतीची पूजा केल्याने घरात रिद्धी आणि सिद्धी येते. ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगितले गेले आहेत, जे केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतात. याशिवाय, ज्यांच्या कुंडलीत बुध दोष आहे त्यांच्यासाठी हे व्रत अत्यंत फलदायी मानले जाते. या विशेष उपायांबद्दल जाणून घेऊया.
1. जर घरातील कोणताही सदस्य अस्वस्थ असेल तर विनायक चतुर्थीला गणेशजींची मूर्ती शेणाने बनवा आणि त्याची पूजा करा. हा उपाय केल्याने कुटुंबाचे आरोग्य सुधारते. याशिवाय, शेण हे पर्यावरणासाठी देखील शुद्ध आहे.
2. विनायक चतुर्थीला श्वेतार्क गणेश मूर्तीची पूजा करा. ही मूर्ती संपत्ती आणि प्रसिद्धीचा घटक मानली जाते. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने कुंडलीतील बुध दोष दूर होतो आणि भाविकांना अनेक फायदे मिळतात.
3. वास्तु दोष दूर करण्यासाठी गणेशाच्या मुद्रेकडे विशेष लक्ष द्या. घरातील वास्तू दोष दूर करण्यासाठी बसलेल्या गणेशमूर्तीची स्थापना करावी आणि कार्यालयात दोन्ही पायावर उभ्या असलेल्या गणेशमूर्तीची स्थापना करावी.
4. घरात सुख आणि समृद्धी आणण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजाच्या आत आणि बाहेर एकाच ठिकाणी गणेशजींची प्रतिमा लावा. याने दोघांची पाठ एकमेकांना भेटतात.
5. जर घराच्या कोणत्याही भागात वास्तू दोष असेल तर तो दूर करण्यासाठी सिंदूर आणि तूप मिसळून स्वस्तिक बनवा. असे केल्याने वास्तू दोषाची समस्या दूर होईल.
Vinayak Chaturthi 2021 | विनायक चतुर्थी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्व आणि विनायक चतुर्थीची कथाhttps://t.co/iLeTHZ7Gcd#VinayakChaturthi #Chaturthi #LordGanesha
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 12, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Lalbaugcha Raja 2021 | लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न
Nag Panchami 2021 | नाग पंचमी कधी? जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि इच्छापूर्तीसाठी काय उपाय करावे?