मुंबई : हिंदू धर्मात कुठल्याही धार्मिक कार्यापूर्वी प्रथम गणेशाची पूजा केली जाते (Vinayak Chaturthi 2021). कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते. मान्यता आहे की, गणेशाची पूजा केल्याने सर्व अडथळे दूर होतात. म्हणूनच त्यांना विघ्नहर्ता म्हणतात. मान्यता आहे की, भगवान गणेश आपल्या भक्तांचे सर्व दु:ख दूर करतात (Vinayak Chaturthi 2021 Know The Shubh Muhurat And Importance Of Worship Lord Ganesha).
विनायक चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. या दिवशी विधीवत गणपतीची पूजा केली जाते. यावेळी विनायक चतुर्थी सोमवारी 14 जून रोजी पडत आहे. विनायक चतुर्थीशी संबंधित महत्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घ्या –
विनायक चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते. भगवान गणेश यांना विघ्नहर्ता म्हणतात, त्यांची उपासना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. विनायक चतुर्थीच्या दिवशी विविध उपाय केल्याने वास्तुशास्त्र आणि ग्रह दोष दूर होतात.
? विनायक चतुर्थी प्रारंभ – 13 जून 9 वाजून 40 मिनिटांपासून
? विनायक चतुर्थी समाप्त – 14 जून रात्री 10 वाजून 34 मिनिटांपर्यंत
? पूजेचा शुभ मुहूर्त – सकाळी 10 वाजून 58 मिनिटांपासून ते दुपारी 1 वाजून 45 मिनिटांपर्यंत
भगवान गणेशाला शक्ती, सामर्थ्य, बुद्धी आणि भरभराटीचे देवता म्हणून त्यांची पूजा केली जाते. मान्यता आहे की, जर कोणी विनायक चतुर्थीच्या दिवशी विधीवत गणरायाची पूजा करते, तर त्या व्यक्तीला सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तुम्हाला गणेशाच्या आशीर्वादाने आयुष्यात यश मिळेल.
? विनायक चतुर्थीला सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालणे शुभ आहे.
? या दिवशी पूजास्थळावर गंगाजल शिंपडा. आपण मंदिरात पूजा देखील करु शकता.
? गणपतीसमोर दिवा प्रज्वलित केल्यानंतर लाल कुंकू, अक्षता, फुले इत्यादी अर्पण करा.
? यानंतर गणेश पाठाचे पठण करा आणि नंतर आरती करावी.
Som Pradosh Vrat 2021 : सोम प्रदोष व्रत, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि या दिवसाचं महत्त्वhttps://t.co/D1t3BWo5Xu#SomPradoshVrat2021 #Mahadev
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 7, 2021
Vinayak Chaturthi 2021 Know The Shubh Muhurat And Importance Of Worship Lord Ganesha
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Garuda Purana | हमखास यशस्वी होण्याचे पाच मार्ग; ‘या’ गोष्टी केल्यात तर कधीच अपयश येणार नाही
Som Pradosh Vrat 2021 | महादेवाला प्रसन्न करण्यासाठी सोम प्रदोष व्रताला हे उपाय करा
Apara Ekadashi 2021 | आज अपरा एकादशी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्व आणि पूजा विधी