Vinayak Chaturthi 2021 | विनायक चतुर्थी, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

| Updated on: Jun 14, 2021 | 8:40 AM

मान्यता आहे की, गणेशाची पूजा केल्याने सर्व अडथळे दूर होतात. म्हणूनच त्यांना विघ्नहर्ता म्हणतात. मान्यता आहे की, भगवान गणेश आपल्या भक्तांचे सर्व दु:ख दूर करतात (Vinayak Chaturthi 2021 Know The Tithi Shubh Muhurat And Importance)

Vinayak Chaturthi 2021 | विनायक चतुर्थी, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी
ganesha
Follow us on

मुंबई : हिंदू धर्मात सर्वप्रथम गणेशाची पूजा केली जाते (Vinayak Chaturthi 2021). कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते. मान्यता आहे की, गणेशाची पूजा केल्याने सर्व अडथळे दूर होतात. म्हणूनच त्यांना विघ्नहर्ता म्हणतात. मान्यता आहे की, भगवान गणेश आपल्या भक्तांचे सर्व दु:ख दूर करतात (Vinayak Chaturthi 2021 Know The Tithi Shubh Muhurat And Importance).

दर महिन्यात दोन चतुर्थी तिथी असतात याला गणेश चतुर्थ म्हणून साजरे केले जाते. विनायक चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. या दिवशी विधीवत गणपतीची पूजा केली जाते. यावेळी विनायक चतुर्थी सोमवारी 14 जून म्हणजेच आज आहे.

विनायक चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते. भगवान गणेश यांना विघ्नहर्ता म्हणतात, त्यांची उपासना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. विनायक चतुर्थीच्या दिवशी विविध उपाय केल्याने वास्तुशास्त्र आणि ग्रह दोष दूर होतात.

भगवान गणेशाला बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याचे देवता म्हणून पूजले जाते. भगवान गणेश यांना मोदक खूप प्रिय असल्याने गणेश चतुर्थीच्या शुभदिनी त्यांनी मोदकाचे नैवेद्य द्यायला हवे. आणि ते प्रसाद स्वरुपात लोकांना द्यावे. विनायक चतुर्थीशी संबंधित महत्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घ्या –

विनायक चतुर्थीचा शुभ मुहूर्त –

? विनायक चतुर्थी प्रारंभ – 13 जून 9 वाजून 40 मिनिटांपासून

? विनायक चतुर्थी समाप्त – 14 जून रात्री 10 वाजून 34 मिनिटांपर्यंत

? पूजेचा शुभ मुहूर्त – सकाळी 10 वाजून 58 मिनिटांपासून ते दुपारी 1 वाजून 45 मिनिटांपर्यंत

पूजेची पद्धत –

गणपतीची पूजा करण्यापूर्वी स्नान करून पवित्र आसनावर बसावे. बाजारातून आणलेली सर्व सामग्री गोळा केल्यानंतरच पूजा सुरु केली पाहिजे. त्याशिवाय, दुर्वाही त्यांना खूप प्रिय आहे, म्हणून शुद्ध ठिकाणाहून निवडलेला दुर्वा नीट धुवावा आणि भगवान गणेशाला अर्पित करावा. मोदकाचे नैवेद्य द्यावे. तुपात बनवलेले मोदक बनवून गणपतीला अर्पण करा.

गणपतीची पूजा केल्यावर त्यांचे स्मरण करत आरती करा. या दरम्यान, आपण आपले मन सात्विक आणि पूर्णपणे आनंदी ठेवले पाहिजे. पूजा संपल्यानंतर सर्व देवतांचे स्मण करा. यानंतर सर्वांना प्रसाद वाटप करा.

विनायक चतुर्थीचे महत्व काय?

भगवान गणेशाला शक्ती, सामर्थ्य, बुद्धी आणि भरभराटीचे देवता म्हणून त्यांची पूजा केली जाते. मान्यता आहे की, जर कोणी विनायक चतुर्थीच्या दिवशी विधीवत गणरायाची पूजा करते, तर त्या व्यक्तीला सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तुम्हाला गणेशाच्या आशीर्वादाने आयुष्यात यश मिळेल.

Vinayak Chaturthi 2021 Know The Tithi Shubh Muhurat And Importance

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Som Pradosh Vrat 2021 : सोम प्रदोष व्रत, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि या दिवसाचं महत्त्व

Dhumavati Jayanti 2021 | देवी धुमावतीची विधवा स्वरुपात पूजा का केली जाते? जाणून घ्या…