मुंबई : हिंदू धर्मात मार्गशीर्ष हा पवित्र महिना मानला जातो. हा महिना विष्णू देव आणि माता लक्ष्मीला समर्पित करण्यात आला आहे. पुराणामध्ये या महिन्यात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत जस की माता पर्वती आणि शंकराचे लग्नसु्द्धा याच काळात केले आहे. पण या महिन्यात अजून एक महत्त्वाचा दिवस येतो तो म्हणजे विनायक चतुर्थी. हिंदू धर्मात भगवान गणेशाला विषेश महत्त्व प्राप्त झाले आहे. कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला गणेशीची पुजा करावी लागते. या गोष्टी शिवाय कोणतेही शुभ कार्य पूर्ण होत नाही.
दर महिन्याच्या चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्ता गणेशजींची पूजा केली जाते. कृष्ण पक्षाची चतुर्थी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते आणि शुक्ल पक्षाची चतुर्थी विनायक चतुर्थी 2021 म्हणून ओळखली जाते.परंतु मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थीचे विशेष महत्त्व आहे. यावेळी 7 डिसेंबर, मंगळवारी रोजी विनायक चतुर्थी साजरी करण्यात येणार आहे.
विनायक चतुर्थी तिथी आणि मुहूर्त २०२१
यावर्षी विनायक चतुर्थी 07 डिसेंबर रोजी पहाटे 02:31 वाजता होणार आहे. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला विनायक चतुर्थीचे भक्त उपवास करतात आणि मनोभावे गजाननाची पूजा करतात.
विनायक चतुर्थी पूजन विधि
अंगारातील विनायक चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा केली जाते. जर आपण ही पूजा केली तर आपण मंगल दोषापासून मुक्ती मिळते. विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी सकाळी स्नान करुन उपवासाचे व्रत करावे आणि संध्याकाळी पिवळे वस्त्र परिधान करून गणेशाची पूजा करावी.
विनायक चतुर्थीची कथा
एका पुराणीक कथेनुसार, देवी पार्वती अंघोळ करत असताना तिने तिच्या शरिरावरील मैलापासून एका मुलाला तयार केले आणि त्याला जीवंत केले. त्यानंतर देवी पार्वतीने त्या मुलाला आदेश दिला की ती आंघोळ करणार आहे आणि या काळात कोणालाही आत येऊ देऊ नये. मुलाने आईच्या आदेशाचे पालन करण्यास सुरुवात केली आणि त्याने कंदाराच्या गेटवर पहारा देण्यास सुरुवात केली. काही वेळाने भगवान शिव यांचे आगमन तिथे झाले. मुलाने महादेवाला आत जाण्यास नकार दिला. यामुळे संतप्त झालेल्या भोलेनाथांनी आणि त्या मुलाचे शिर शरिरापासून वेगळे केले.
काही वेळानंतर, अंघोळ केल्यावर जेव्हा देवी पार्वती आळी आणि त्यांनी मुलाचे शिर शरिरापासून विभक्त झालेले पाहिले. हे पाहून देवी पार्वतीला खूप राग आला. देवी पार्वतीचा राग पाहून सर्व देवी-देवता भयभीत झाले. यानंतर, भगवान शिव त्यांच्या गणांना आज्ञा देतात की जंगलात जावून तुम्हाला जो प्राणी सर्व प्रथम दिसेल त्याला घेऊन या. शिव गण एका गजाला घेऊन येतात. भगवान शिव मुलाच्या शिराला मुलाच्या शरिराशी जोडतात. हे पाहून देवी पार्वती म्हणते की प्रत्येकजण माझ्या मुलाची थट्टा करेल. मग भगवान शिव त्याला एक वरदान देतात की तो गणपती म्हणून ओळखला जाईल आणि सर्व देवांनी त्याला वरदान दिले की, पहिली पूजा गणपतीची होईल. हाच तो विनायक चतुर्थीचा दिन.
विनायक चतुर्थीचे महत्व काय?
जर कोणी विनायक चतुर्थीच्या दिवशी विधीवत गणरायाची पूजा करते, तर त्या व्यक्तीला सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तुम्हाला गणेशाच्या आशीर्वादाने आयुष्यात यश मिळते.
(टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.)
संबंधित बातम्या
05 December 2021 Panchang : कसा असेल रविवारचा दिवस, शुभ अशुभ मुहूर्त, पाहा काय सांगतेय पंचांग
Chandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल