जगातलं सर्वात मोठं महापाप कोणतं? पाहा गरूड पुराण काय सांगतं?

| Updated on: Mar 24, 2025 | 8:04 PM

हिंदू धर्मामध्ये गरूड पुराणाला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. गरूड पुराणाचा समावेश हा हिंदू धर्मामध्ये असलेल्या 18 महापुराणांमध्ये होतो.

जगातलं सर्वात मोठं महापाप कोणतं? पाहा गरूड पुराण काय सांगतं?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

हिंदू धर्मामध्ये गरूड पुराणाला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. गरूड पुराणाचा समावेश हा हिंदू धर्मामध्ये असलेल्या 18 महापुराणांमध्ये होतो. जगाचे तारणहार भगवान विष्णू यांनी आपल्या भक्तांना जे ज्ञान दिलं, त्यावरच गरूड पुराण आधारीत आहे. मृत्यूनंतर व्यक्तीच्या आत्म्याचा प्रवास कसा होतो, याचं वर्णन गरूड पुराणामध्ये करण्यात आलं आहे, स्वर्ग आणि नरक याबाबत सविस्तर माहिती गरूड पुराणामध्ये सांगितलेली आहे. सोबत तुम्ही पृथ्वीवर असताना जी पापं करतात त्या पापांसाठी तुमच्या मृत्यूनंतर तुम्हाला कोणती शिक्षा मिळते? हे देखील गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे.

गरूड पुरामध्ये असं सांगितलेलं आहे की, व्यक्तीच्या मृत्यूनंतर पापी व्यक्तीचा आत्मा हा यमराजांसमोर आणला जातो. तिथे चित्रगुप्त त्या व्यक्तिच्या कर्मांचा सर्व हिशोब करतात. त्यावरून ठरवलं जातं की व्यक्तीला स्वर्गात पाठवाचं की, नरकामध्ये पाठवायचं. जर व्यक्तीने आपल्या आयुष्यात खूप सगळे पाप केले असतील तर त्याची रवानगी कोणत्या नरकात करायची हे देखील ठरवलं जातं. तुम्ही तुमच्या आयुष्यात काय कर्म करतात त्यावर तुमचा पुढचा जन्म अवलंबून असतो, असं देखील गरूड पुराणामध्ये सांगितलं आहे. जाणून घेऊयात कोणत्या पापाला गरूड पुराणामध्ये नेमकी कोणती शिक्षा सांगितली आहे ती.

हत्येच्या पापासाठी कोणती शिक्षा?

गरूड पुरामध्ये 36 नरकांचं वर्णन केलं आहे. व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार शिक्षा दिली जाते. गरूड पुराणामध्ये भ्रूण हत्या करणाऱ्याला महापापी म्हटलं आहे. हे सर्वात मोठं पाप आहे, असं गरूड पुराण सांगतं. जे लोकं भ्रूण हत्या करतात त्यांना रोध नावाच्या नरकात पाठवून भयंकर शिक्षा दिली जाते. असे लोक त्यांच्या पुढच्या जन्मामध्ये नपुंसक बनतात असं गरूड पुराणामध्ये सांगितलं आहे.

गुरूची निंदा आणि चोरीसाठी कोणती शिक्षा?

जे लोक गुरुची निंदा करतात अपमान करतात, चोरी करतात त्यांना त्यांच्या मृत्यूनंतर शबल नावाच्या नरकात पाठवलं जातं. कठोर शिक्षा दिली जाते, असं गरुड पुराण सांगतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)