मुंबई : आचार्य चाणक्य हे भारतातील एक विद्वान होते. त्यांनी दिलेली शिकवण आपण आत्मसात केला तर आपले जिवन सुखकर होऊ शकते असे मानले जाते. आचार्य यांच्या नीतीशास्त्र या पुस्तकात त्यांनी धर्म, समाज, राजकारण, पैसा इत्यादी सर्व विषयांबद्दल बरेच काही सांगितले आहे, जे प्रत्येक व्यक्तीला योग्य आणि अयोग्य यातील फरक सांगते.
आचार्य चाणक्य यांचे शब्द कधी कधी खूप कठोर वाटतात पण त्यांनी सांगितलेल्या गोष्टीचे पालन केल्यास आपण आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी साध्य करु शकतो.आचार्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीत जीवनाचे रहस्य दडलेले आहे.
आचार्य चाणक्य यांच्या नीतीशास्त्र या पुस्तकात त्यांनी धर्म, समाज, राजकारण, पैसा इत्यादी सर्व विषयांबद्दल बरेच काही सांगितले आहे, जे प्रत्येक व्यक्तीला योग्य आणि अयोग्य यातील फरक सांगते. आचार्यांचे शब्द समजून घेतले तर जीवनातील सर्व अडचणी सहज दूर होऊ शकतात. येथे जाणून घ्या आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टी ज्यातून तुम्ही फसवणूक आणि दुःखी होण्यापासून वाचू शकता.
आचार्य चाणक्य मते ‘वाद करणाऱ्यांना घाबरू नका, तर फसवणाऱ्या लोकांना घाबरा’
नीती शास्त्रामध्ये आचार्यांनी दोन प्रकारच्या लोकांबद्दल माहिती दिली आहे. त्यांच्या मते तुम्ही वाद घालणाऱ्या लोकांपासून दूर राहू त्यांना जास्त घबरले नाही तरी चालेल पण जे लोक जे तुमच्या तोंडावर गोड बोलतात आणि पाठीमागे तुमचे वाईट करतात ते धोकादायक असतात. असे लोक तुमची फसवणूक करतात. वादविवाद करणारे आपले मन आपल्यासमोर ठेवतात, परंतु फसवणूक करणारे कधीही आपला हेतू व्यक्त करत नाहीत. तुमच्या समोर जे ऐकायचे ते ते सांगतात. अशा लोकांपासून सावध रहा.
जे लोक तुम्हाला महत्त्व देतात त्याच लोकांना आयुष्यात महत्त्व द्या
आयुष्यात अनेक वेळा तुम्हाला अशी माणसे भेटतात, ज्यांच्यापासून तुम्ही खूप प्रभावित होतात आणि त्यांना जास्त महत्त्व देऊ लागतात. पण जर तुम्ही एखाद्याला जास्त महत्त्व दिले तर त्याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती तुमच्याशी तसाच वागेल. जेव्हा समोरील व्यक्ती आपण ज्या प्रमाणे वागतो तसा वागत नाही तेव्हा जास्ता त्रास होता. हा अनावश्यक त्रास टाळण्यासाठी जे लोक तुम्हाला महत्त्व देतात त्याच लोकांना आयुष्यात महत्त्व द्या असे आचार्य चाणाक्या सांगतात.
इतर बातम्या :
दीपावलीला चतुर्ग्रही योग, या 5 राशींवर होणार माता लक्ष्मीची विशेष कृपा
Chanakya Niti : आयुष्यात ‘या’ परिस्थिती असतात अधिक वेदनादायक; जाणून घ्या कोणत्या ते