मार्गशीर्ष अमावस्या कधी? जाणून घ्या तारीख, मुहूर्त, महत्त्व अन् पितरांना प्रसन्न करण्यासाठी उपाय

| Updated on: Nov 30, 2024 | 3:20 PM

मार्गशीर्ष अमावस्या यावेळी शनिवारी 30 नोव्हेंबर रोजी आहे. ही वर्षातील शेवटची शनि अमावस्या आहे. मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णुशी विधी पूर्वक पूजा केली जाते. या दिवशी स्नान करून दान केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते. मार्गशीर्ष अमावस्या तिथी आणि शुभमुहूर्त याबद्दल जाणून घेऊ.

मार्गशीर्ष अमावस्या कधी? जाणून घ्या तारीख, मुहूर्त, महत्त्व अन् पितरांना प्रसन्न करण्यासाठी उपाय
margashirsha amavasya
Image Credit source: Tv9
Follow us on

मार्गशीर्ष अमावस्याचे पौराणिक महत्त्व विशेष मानले जाते. मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंचा सर्वात आवडता महिना असून मार्गशीर्ष अमावस्येला विधीनुसार त्यांची पूजा केल्याने तुमचे सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतात आणि तुम्हाला भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो. मार्गशीर्ष अमावस्या शनिवार 30 नोव्हेंबर रोजी आहे. या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान करण्याचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगितले आहे. मार्गशीर्ष अमावस्येचा शुभ मुहूर्त आणि महत्व जाणून घेऊया.

कधी आहे मार्गशीर्ष अमावस्या?

एक डिसेंबर 2024 रोजी मार्गशीर्ष अमावस्या व्रत पाळण्यात येणार आहे. पंचांगानुसार अमावस्या तिथी 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:29 वाजता सुरू होईल आणि एक डिसेंबर रोजी सकाळी 11:50 वाजता संपेल. ज्यांना उपवास करायचा आहे आणि स्नान करायचे आहे त्यांनी एक डिसेंबर रोजी मार्गशीर्ष अमावस्येचे विधी करावेत आणि जे लोक त्यांच्या पूर्वजांची पूजा किंवा विधी करतात त्यांनी 30 नोव्हेंबरला करावे. ही वर्षातील शेवटची शनी अमावस्या असेल.

हे सुद्धा वाचा

मार्गशीर्ष अमावस्येचे महत्त्व

अमावस्या हा महत्त्वाचा दिवस आहे जो दर महिन्याला येतो हा दिवस पूर्वजांचे स्मरण आणि सन्मान करण्याचा आहे. पितृदोष टाळण्यासाठी लोक तर्पण आणि पिंडदान करतात. आपल्या पूर्वजांना पाणी आणि अन्न अर्पण करण्याचा हा एक मार्ग आहे. याशिवाय अमावस्येच्या दिवशी शनि देवाच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की यामुळे शनीच्या वाईट प्रभावापासून आराम मिळतो. काही लोक या पवित्र दिवशी आपले मन आणि शरीर शुद्ध राहावे म्हणून उपवास देखील करतात अमावस्येच्या दिवशी अनेक प्रकारच्या धार्मिक विधी आणि पूजा देखील होतात. शनिवारी येणाऱ्या अमावस्येचे आणखीन जास्त महत्त्व आहे. या दिवशी दान केल्याने शनीच्या स्थितीतही लाभ होतो.

मार्गशीर्ष अमावस्येला पितरांना प्रसन्न करण्यासाठी काय करावे?

  • मार्गशीर्ष अमावस्येला पितरांना प्रसन्न करण्यासाठी संध्याकाळी पिंपळाच्या झाडावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.
  • मार्गशीर्ष अमावस्या शनिवारी येत असल्याने शनीला प्रिय असणाऱ्या वस्तूंचे दान करा. काळे उडीद, काळे तीळ आणि काळी छत्री दान करणे शुभ राहील.
  • मार्गशीर्ष अमावस्येला विधिवत पूजा करून पितृ स्तोत्र व पितृ कवच पठण करावे असे केल्याने पितृ दोषापासून आराम मिळतो.