मार्गशीर्ष पौर्णिमा कधी? जाणून घ्या तारीख, पूजाविधी आणि महत्त्व

| Updated on: Dec 04, 2024 | 5:10 PM

हिंदू धर्मात पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. याशिवाय मार्गशीर्ष महिन्यात येणारी पौर्णिमा ही विशेष मानली जाते. असे मानले जाते की या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून दान केल्याने मनुष्याला अनेक पुण्य प्राप्त होतात.

मार्गशीर्ष पौर्णिमा कधी? जाणून घ्या तारीख, पूजाविधी आणि महत्त्व
मार्गशीर्ष पौर्णिमा
Follow us on

पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू ची पूजा केली जाते. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात येणारी पौर्णिमा ही विशेष मानली जाते. या दिवशी विष्णू सोबत लक्ष्मी आणि चंद्राची पूजा केल्याने सुख-समृद्धी मिळते. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला अगाहन पौर्णिमा, मोक्षदायिनी पौर्णिमा आणि बत्तीसी पौर्णिमा म्हणून ओळखले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार या तिथीला केलेल्या दानाचे फळ कोणत्याही पौर्णिमेच्या दिवसापेक्षा 32 पटीने जास्त मिळते.

कधी आहे मार्गशीर्ष पौर्णिमा?

वर्षाच्या शेवटच्या महिन्याची पौर्णिमा मार्गशीर्ष महिन्याच्या शनिवारी 14 डिसेंबर रोजी दुपारी 4: 58 मिनिटांनी सुरू होईल. रविवार 15 डिसेंबर रोजी दुपारी 2:31 मिनिटांनी संपेल. त्यानुसार 15 डिसेंबरला पौर्णिमा तिथीचे व्रत करता येणार आहे. 15 डिसेंबरला संध्याकाळी 5:14 मिनिटांनी चंद्रोदय होईल.

मार्गशीर्ष पौर्णिमा पूजा विधी

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी उपवास केल्याने चांगले फळ प्राप्त होते. या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र नदीमध्ये स्थान करणे अत्यंत शुभ मानले जाते. जर तसे शक्य नसेल तर स्नान करण्याच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून तुम्ही स्नान करू शकता. यानंतर देवघर स्वच्छ करून देवघरात तुपाचा दिवा लावून या व्रताला सुरुवात केली जाते. त्यानंतर सर्व देवी देवतांना अभिषेक करून त्यानंतर विधीनुसार विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करा. पूजे नंतर देवांना नैवेद्य दाखवा त्या नैवेद्यावर तुळशीचे पान आवश्यक ठेवा.

नैवेद्य दाखवल्यानंतर विष्णू आणि लक्ष्मीची आरती करा. त्यानंतर संध्याकाळी चंद्रोदय झाल्या नंतर चंद्राची पूजा करून चंद्राला अर्घ्य द्या. असे केल्याने सगळ्या दोषांपासून मुक्ती मिळते. पूजा केल्यानंतर या दिवशी दान आवश्य करा.

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी या मंत्राचा करा जप

ॐ श्रां श्रीं श्रौं सः चंद्राय नमः
या रक्ताम्बुजवासिनी विलासिनी चण्डांशु तेजस्विनी। या रक्ता रुधिराम्बरा हरिसखी या श्री मनोल्हादिनी॥
शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्ण शुभाङ्गम् । लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्॥

मार्गशीर्ष पौर्णिमेचे महत्त्व

धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी विधीनुसार विष्णू आणि लक्ष्मी देवीची पूजा केल्यास तसेच या दिवशी उपवास केल्यास जीवनात सुख शांती राहते. त्यासोबतच व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)