मुंबई : जी अमावस्या सोमवारी (Monday) येते तिला सोमवती अमावस्या म्हणतात. अमावास्या अशुभ असते, असे मानले जाते. मात्र, तसे नाही. अमावास्येला अनन्य साधारण महत्त्व असते आणि त्याचा लाभही होतो. सोमवती अमावास्येला महादेव शिवशंकराची उपासना करणे लाभदायक असते, अशी मान्यता आहे. हिंदू (Hindu)धर्मग्रंथांमध्ये सोमवती अमावस्या अत्यंत शुभ मानली जाते . सोमवती अमावस्येच्या दिवशी उपवास, उपासना आणि गंगास्नानाला विशेष महत्त्व आहे . स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी उपवास करतात. त्याचबरोबर पितृ दोष निवारणासाठीही हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या वेळी माघ महिन्याची अमावस्या 31 जानेवारी, सोमवार रोजी दुपारी 02:18 वाजता सुरू होईल आणि मंगळवार, 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:16 पर्यंत राहील. माघ महिन्यात आल्याने याला माघी अमावस्या किंवा मौनी अमावस्या( Mauni Amavasya)म्हणतात .
सोमवती अमावस्येच्या दिवशी या कामांमुळे पितर प्रसन्न होतील
1. सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी पाण्यात तीळ अर्पण करून दक्षिण दिशेला तर्पण करावे. अमावस्या तिथी ही पूर्वजांना समर्पित आहे.
2. पिंपळाच्या झाडाची पूजा करा आणि 108 वेळा प्रदक्षिणा करून पिवळ्या रंगाचा पवित्र धागा बांधा. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. यामुळे तुम्हाला पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल आणि तुमच्या कुटुंबात आनंद नांदेल.
3. शक्य असल्यास, पिंपळाचे रोप लावा आणि या वनस्पतीची सेवा देखील करा. यामुळे तुमच्या वडिलांना खूप आनंद होतो. जसजसे पिंपळाचे रोप वाढत जाईल तसतसे तुम्हाला तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल आणि तुमच्या घरातील सर्व संकटे हळूहळू दूर होतील अशी मान्यता आहे.
4. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करावी. पूजा करण्यापूर्वी स्वतःवर गंगाजल शिंपडा. या दिवशी पितरांसाठी गीतेच्या सातव्या अध्यायाचे पठण केल्यास त्यांचे दुःख दूर होऊन पितर सुखी होतात.
5. पितरांचे ध्यान करताना या दिवशी दान करावे.
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)
Astro Tips for Saturday | शनिवारी चुकूनही या गोष्टी विकत घेऊ नका, नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ येईल
Vastu tips | बाथरूमशी संबंधित वास्तु नियम जाणून घ्या, आणि आजारांना लांब ठेवा