हिंदू धर्मातील एक विशेष सण म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांत हा वर्षातील पहिला सण आहे. मकर संक्रांत कधी 15 जानेवारी तर कधी 14 जानेवारीला साजरी केली जाते. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते. पंचांगानुसार 2025 मध्ये मकर संक्रांत कधी आहे आणि या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त कोणता ते जाणून घेऊ.
पंचांगानुसार 2025 मध्ये मकर संक्रांत 14 जानेवारीला मंगळवारी आहे. सकाळी 09 : 03 मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 09 : 03 पासून सुरु होईल आणि संध्याकाळी 05: 46 मिनिटांनी संपेल. या मुहूर्तावर स्नान करून दान केल्यास पुण्य प्राप्त होते हा पूर्ण कालावधी 8 तास 42 मिनिटांचा आहे.
मकर संक्रांतीच्या दिवशी पुण्या काळ सकाळी 09.03 पासून सुरू होईल आणि 10.48 नंतर संपेल. हा महापुण्य काळ एक तास 45 मिनिटांचा आहे. ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार या काळात स्नान आणि दान करणे अत्यंत शुभ मानल्या जाते. पुण्य काळ आणि महापुण्यकाळात मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करून दान केल्यास विशेष फळ प्राप्ती होते.
हिंदू धर्मानुसार या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळे दिवस मोठे होतात आणि थंडी हळूहळू कमी होते. मकर संक्रांत हा सण नवीन पिकाच्या आगमनाचे प्रतीक आहे. मकर संक्रांति पासून सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणाकडे जाऊ लागतो. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा, यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची पूजा करण्याची परंपरा आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)